Central Zone Youth Festival : सेंट्रल झोन युवा महोत्सवात २२ विद्यापीठांचा सहभाग File Photo
छत्रपती संभाजीनगर

Central Zone Youth Festival : सेंट्रल झोन युवा महोत्सवात २२ विद्यापीठांचा सहभाग

नाना पाटेकर, उपेंद्र लिमये यांची उपस्थिती, मंगळवारपासून सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

22 universities participate in Central Zone Youth Festival

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या ३९ व्या आंतर विद्यापीठीय सेंट्रल झोन युवा महोत्सवाचे आयोजन यंदा शहरातील एमजीएम विद्यापीठात मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर ते शनिवार, दि. २९ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाविषयी माहिती दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांचीही उपस्थिती होती. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर आदी उपस्थित असणार आहेत.

युवा महोत्सवाचा समारोप समारंभ शनिवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जेएनईसी लॉन्स येथे अभिनेते उपेंद्र लिमये आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज ३९ वा आंतर विद्यापीठीय सेंट्रल झोन युवा महोत्सव हा केवळ सांस्कृतिक सोहळा नसून भारतीय तरुणाईच्या सर्जनशीलतेचा, ऊर्जा आणि अपार क्षमतेचा भव्य उत्सव आहे.

एआययु ही संस्था १९८५ पासून सातत्याने राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावर इंटर युनिव्हर्सिटी यूथ फेस्टिव्हल्स आयोजित करत आहे. देशभरातील उच्च शिक्षण क्षेत्रातील सुमारे ४ कोटी तरुण विद्यार्थ्यांसाठी युवा कार्यक्रमांचे आयोजन करणारी ही एकमेव राष्ट्रीय समन्वयक संस्था आहे. हा महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलगुणांना वाव देण्याचे एक व्यासपीठ असून या माध्यमातून विविधतेतील ऐक्य यांची अनुभूती देणारा हा उत्सव आहे.

विविध विद्यापीठातील कलाकारांना एकत्र आणत हा महोत्सव भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा तरुण मनांपर्यंत पोहोचवतो. युवा कलाकारांना त्यांच्यातील सृजनशीलता, कला, कौशल्ये आणि प्रतिभा सादर करण्यासाठीचे हे एक व्यासपीठ आहे. या महोत्सवास सगळ्यांना खुला प्रवेश असून मोठ्या संख्येने नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि रसिक प्रेक्षकांनी या युवा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन एमजीएम विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.

अकराशे कलावंत होणार सहभागी

पाच दिवस चालणाऱ्या ३९ व्या आंतरविद्यापीठीय सेंट्रल झोन युवा महोत्सवात मध्यप्रदेश, छत्तीसगडसह मराठवाडा आणि विदर्भातील २४ विद्यापीठांतील सुमारे ११०० पेक्षा अधिक विद्यार्थी ड्डू विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. म्युझिक, डान्स, लिटररी, थिअटर आणि फाईन आर्ट्स अशा एकूण मुख्य ५ कलाप्रकारांत विविध २७ प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT