Sambhajinagar News : जॅकवेलवरील पंपावर बसवली पहिली ३७०० अश्वशक्तीची मोटार

नवीन पाणीपुरवठा योजना : तासाला ४५ लाख लिटर पाणी फेकणार
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जॅकवेलवरील पंपावर बसवली पहिली ३७०० अश्वशक्तीची मोटारFile Photo
Published on
Updated on

The first 3700 horsepower motor installed on the pump at Jackwell

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी धरणातील जॅकवेलवर बसविण्यात आलेल्या महाकाय पंपावर तब्बल १६ टन वजनाची व ३७०० अश्वशक्ती क्षमतेची पहिली विद्युत मोटार शनिवारी (दि. २२) क्रेनच्या साह्याने बसविण्यात आली असून त्यासाठी मायक्रॉनमध्ये निरीक्षण करून सूक्ष्म पद्धतीने ही मोटार फिट केली. ही मोटार तासाला ४५ लाख लिटर पाणी फेकणार आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : विविध देशांतील राजदूतांची बीबी का मकबऱ्याला भेट

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कंत्राटदार म्हणून नियुक्त केलेल्या जीव्हीपीआर कंपनीने सिव्हील वर्क आणि मुख्य जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण केले असून केवळ ७७ मीटर मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम शिल्लक आहे. जायकवाडी धरणात जॅकवेलच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याचा स्लॅब टाकण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात जॅकवेलमध्ये पाणी उपसा करण्यासाठी दोन पंप बसविण्यात आले. त्यावरील स्लॅबचे काम पूर्ण झाल्यानंतर ३७०० हॉर्स पॉवरची विद्युत मोटार बसविण्याची तयारी सुरू केली. ८० टन क्षमतेची अवाढव्य क्रेन मागविण्यात आली. क्रेनच्या साह्याने १६ टन क्षमतेची एअरकुल विद्युत मोटार उचलून पंपावर बसविण्यात आली. त्यासाठी किर्लोस्कर कंपनीचे तज्ञ अभियंत्यांना व कामगारांना बोलावण्यात आले.

Sambhajinagar News
Sambhajinagar Earthquake : शहरात भूकंप ? प्रशासनाची धावाधाव...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे आणि कार्यकारी अभियंता तुषार टेकवडे हे विद्युत मोटार बसविण्यासाठी जॅकवेलवर ठाण मांडून होते. यापूर्वी मध्यप्रदेशमधील उपसा जलसिंचन योजनेसाठी आणि आंध्रप्रदेशातील पाणी योजनेसाठी २००८ व २०१७साली या एवढ्या मोठ्या हॉर्सपॉवर क्षमतेचा विद्युत पंप बसविण्यात आला होता. त्यानंतर तिसऱ्यांदा हा विद्युत पंप शहराच्या पाणी योजनेसाठी वापर केला जात आहे.

पंपाला जोडले प्रेशर व्हॉल्व्ह

जॅकवेलमध्ये बसविण्यात आलेल्या ३७०० हॉर्स पॉवर पंपातून पाणी उपसा होणार आहे. हे पाणी २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकले जाणार आहे. त्यासाठी पंपावर पाण्याचा दाब नियंत्रित ठेवणारे व्हॉल्व्ह जोडले जात आहे. जलवाहिनी बंद झाली तरी पाण्याचा दाब नियंत्रित ठेवून पंपामध्ये पाणी परत जाऊ नये, पाइपलाइनमध्येच पाणी थांबवावे, पाईपलाईनमधील दाब नियंत्रित ठेवण्यासाठी प्रेशर व्हॉल्व्ह बसविला जात आहे. या व्हॉल्व्-हद्वारे पाइपलाइनमध्ये पाण्याचा दाब नियंत्रणात राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news