छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : २ लाख १९ हजार विद्यार्थ्यांची कॅपसाठी प्रवेश नोंदणी

९ अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

2 lakh 19 thousand students register for admission for CAP

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६-२७च्या प्रवेशासाठी अभियांत्रिकी, एमबीए, बीएड, बीपीएड, एमपीएड, ३ व ५ वर्षीय एलएलबी, एमएड व बीएड-एमएड (३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) या ९अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाची नोंदणी सुरू आहे.

आजपर्यंत २ लाख १९ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी २०२६ ची सीईटी दिली आहे, त्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या नोंदणीच्या अंतिम तारखेआधी केंद्रीभूत प्रवेशासाठी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. इतर अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

बीई-बीटेक व एमबीए-एमएमएस या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाची नोंदणी २ जुलैपासून सुरू असून, नोंदणीची अंतिम तारीख १२ जुलै २०२६ आहे. बीएड या अभ्यासक्रमाची नोंदणी २ जुलैपासून सुरू असून, अंतिम तारीख १६ जुलै आहे. बीपीएड, एमपीएड व ३ वर्षीय एलएलबी या अभ्यासक्रमाची नोंदणी ११ जूनपासून सुरू असून, अंतिम तारीख ६ जुलै आहे.

एमएड व बीएड-एमएड (३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) याची नोंदणी १६ जूनपासून सुरू असून, अंतिम तारीख ६ जुलै आहे. तर ५ वर्षीय एलएलबीची १९ जूनपासून नोंदणी सुरू आहे. अंतिम तारीख ९ जुलै आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT