नाथसागर धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

नाथसागर धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले

१२ हजार ५७६ क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

पैठण : पैठण येथील नाथसागर धरण परिसरात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. त्यामुळे येथील नाथसागर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण शंभर टक्के भरलेले आहे. धरण तुडूंब भरल्यांने धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले आहेत. तर धरणातून १२ हजार ५७६ क्युसेक गोदावरी नदीत विसर्ग वाढविण्याचा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण अभियंता विजय काकडे यांनी रविवारी (दि.२०) वाढवला आहे.

मागील दोन दिवसांपासून शुक्रवारी आणि शनिवारी रोजी धरणाच्या वरील भागात व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने धरणात जमा होणाऱ्या पाण्याच्या आवक वाढली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी रविवारी (दि.20) धरणाचे १८ दरवाजे एक फुट उघडले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT