छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील हॉटेलमध्ये घडलेल्या आनिकांडानंतर महापालिकेने शाळा, महाविद्यलये, कोचिंग क्लासेस, मॉल्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, बारचे फायर आडिट करण्याचे आदेश अनिशमन विभागाला दिले. त्यानुसार अग्निशमन विभागाने केलेल्या तपासणीत तब्बल १९९ पैकी १७४ हॉटेल्सकडे अग्निशमन परवाने नसल्याचे अढळले. नोटीस बजावल्यानंतर यातील काहींनी परवाना घेण्याची तयारी दर्शविली. परंतु, जे अजूनही दुर्लक्षच करीत आहेत, त्यांना अंतिम नोटीस बजावून हॉटेल सील करा, असे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी अग्निशमन विभागाला दिले आहेत.
गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये हॉटेल्सला लागलेल्या अगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी तातडीने अग्निशमन विभागाची बैठक घेत रुग्णालये, शासकीय व खासगी इमारती, तारांकित हॉटेल्स, लॉजिंग, बार, शाळा महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, मॉल्स, सिनेमा हॉल्स आणि व्यावसायिक संकुले यांच्याकडे अग्निशमन यंत्रणा आहेत की नाही, याची तपासणी करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार अग्निशमन विभागाने शहरातील सर्व संस्थांचे फायर ऑडिट केले. दोन आठवड्यांत शहरातील हॉटेल्ससह विविध आस्थापनांचे सर्वेक्षण केल्यानंतर ज्यांच्याकडे फायर एनओसी नाहीत, त्यांना नोटीस बजाविण्यात आल्या. यात शहरातील १९९ हॉटेल्सचा समावेश आहे. त्यातील केवळ केवळ ४ हॉटेलधारकांकडेच अग्निशमन विभागाची एनओसी आणि दरवर्षी ही एनओसी नुतनीकरण करीत असल्याचा अहवाल त्यासोबतच यंत्रणा अडळून आली.
दरम्यान, त्याशिवाय २१ ते २४ हॉटेल्सकडे फायर परवाने तर अढळले परंतु, त्यांनी वेळोवेळी नुतनीकरण करणे टाळल्याचे दिसून आले. त्यासोबतच अग्निशमन यंत्रणाही कालबाह्य झाल्याचे अढळले.
दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने या सर्व आस्थापनांना नोटीस बजावल्यानंतर यातील काही हॉटेल्स व्यवसायिकांनी अग्निशमन परवाना घेण्याची व काहींनी नूतनीकरण करून यंत्रणा सज्ज करण्याची तयारी दर्शविली असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले. परंतु अजूनही बहुतांश हॉटेल्स व्यवसायिकांनी नोटीसला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या व्यवसायिकांना दुसरी अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यावरही प्रतिसाद दिला नाहीच तर त्यांचे हॉटेल्स सील करण्यात येणार आहे.
आठवडाभरात कारवाई- शहरातील हॉटेल्स व्यावसायिकांना अनिशमन परवानाबाबत नोटीस बजावली आहे. ज्यांनी पहिल्या नोटीसकडे दुर्लक्ष केले त्यांना दुसरी अंतिम नोटीस बजावण्याचे आदेश अग्निशमन विभागाला दिले आहेत. या अंतिम नोटीसकडेही दुर्लक्ष केले. तर पुढील आठवड्यापासून संबंधित हॉटेल्सविरोधात सील करण्याची कारवाई सुरू करण्यात येईल.अमोल येडगे, आयुक्त महापालिका, छत्रपती संभाजीनगर