NEET exam file photo
छत्रपती संभाजीनगर

NEET exam : शहरातील ५० केंद्रांवर १६ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा

गेल्यावर्षी नीट परीक्षेतील गोंधळ आणि काठिण्य पातळीमुळे निर्माण झालेली धाकधूक यंदा अखेर संपुष्टात आली.

पुढारी वृत्तसेवा

16,986 students appeared for the NEET exam at 50 centers across the city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

गेल्यावर्षी नीट परीक्षेतील गोंधळ आणि काठिण्य पातळीमुळे निर्माण झालेली धाकधूक यंदा अखेर संपुष्टात आली. रविवारी (दि.३) परीक्षा शांततेत पार पडली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा पेपर तुलनेने सोपा होता, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शहरात रविवारी ५० केंद्रांवर नीट ही वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १७ हजार ३७४ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी १६ हजार ९८६ विद्यार्थी प्रत्यक्ष परी क्षेला उपस्थित राहिले.

गेल्यावर्षी झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा सर्व परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजेपर्यंत केंद्रावर रिपोर्टिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार विद्यार्थी वेळेत केंद्रांवर दाखल झाले. उन्हापासून संरक्षणासाठी अनेक ठिकाणी पंडालची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांचे फेस रेकग्रिशन, अंगठ्याचे ठसे घेणे, प्रवेशपत्र व ओळखपत्रांची काटेकोर पडताळणी करूनच केंद्रात प्रवेश देण्यात आला.

केंद्रात प्रवेश देताना

काटेकोर पडताळणी करण्यात आली. प्रश्नपत्रिकेबाबत सांगायचे झाल्यास मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचे सर्वच प्रश्न सोपे होते. विशेषतः बायोलॉजीचा पेपर मला खूपच सोपा वाटला. केंद्रावर पिण्याच्या पाण्यासह इतर आवश्यक सुविधांचीही चांगली व्यवस्था करण्यात आली होती.

यंदाचा पेपर सोपा !

परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांचे प्रश्न तुलनेने सोपे होते. ऑर्गेनिक व इनऑर्गेनिक रसायन शास्त्रातील संकल्पनांवर आधारित प्रश्नही सुटसुटीत होते. मात्र बायोलॉजी विषयातील प्रश्न वाचून उत्तरे लिहिण्यास वेळ लागल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. एकूणच यंदाचा पेपर सोपा राहिल्याचे मत बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT