Crime News : तंबाखूच्या बहाण्याने घरात घुसून १३ वर्षीय मुलीचा विनयभंग File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : तंबाखूच्या बहाण्याने घरात घुसून १३ वर्षीय मुलीचा विनयभंग

घरात टीव्ही पाहत बसलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तंबाखू मागण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला.

पुढारी वृत्तसेवा

13-year-old girl molested by man who entered house under the pretext of asking for tobacco

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरात टीव्ही पाहत बसलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तंबाखू मागण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. ही संतापजनक घटना शनिवारी (दि.८) दुपारी ४ वाजेच्या सुमारास जुनाबाजार भागात घडली. यावेळी मुलीचा १० वर्षांचा लहान भाऊ आणि ११ वर्षांच्या चुलत भावाने मोठे धाडस दाखवत या ३५ वर्षीय नराधमाला झोडपून काढले, ज्यामुळे त्याने तेथून पळ काढला.

अनिल प्रकाश खंडागळे (३५, रा. जुनाबाजार) असे आरोपीचे नाव असून, सिटी चौक पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पीडित १३ वर्षीय मुलीची आई कापड दुकान चालवते. शनिवारी (दि.८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे दुकानावर कामासाठी गेल्या होत्या.

घरात त्यांची १३ वर्षीय मुलगी, तिचा १० वर्षांचा लहान भाऊ आणि ११ वर्षांचा चुलत भाऊ हे तिघेच होते. दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास हे तिघे घराचा दरवाजा ओढून घेऊन टीव्ही पाहत बसले होते. त्यावेळी ओळखीचा असलेला आरोपी 'अनिल काका' अचानक दरवाजा लोटून घरात आला आणि त्याने पीडित मुलीकडे 'तंबाखूची पुडी दे', अशी मागणी केली. मुलीने फ्रीजवर ठेवलेली तंबाखूची पुडी त्याला दिली असता आरोपी अनिलने तिचा गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने 'तुम्ही असे का करता?' असे म्हणत आरडाओरड सुरू केली.

बहिणीचा आवाज ऐकताच दोन्ही लहान भावांनी आरोपी अनिलला मारायला सुरुवात केली. या दोन लहान मुलांच्या अनपेक्षित व धाडसी प्रतिकारामुळे आरोपी घाबरला आणि त्याने घरातून धूम ठोकली.

गुन्हा दाखल होताच ठोकल्या बेड्या

सायंकाळी ७ वाजता पीडितेची आई काम संपवून घरी परतल्यानंतर रडत असलेल्या मुलीने घडलेला सर्व भयानक प्रकार त्यांना सांगितला. संतापलेल्या आईने तात्काळ मुलीला सोबत घेऊन सिटी चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. आरोपी अनिल खंडागळे याच्याविरुद्ध बीएनएस कलम ७४, ७५ आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल होताच तपास अधिकारी उपनिरीक्षक भागवत मुठाळ यांनी आरोपी खंडागळे याला बेड्या ठोकल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT