मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अमृता चौगुले

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्‍तसेवा : वरुड बुद्रुक शुक्रवार रात्री उशिरा पिंपळगाव रेणुकाई येथून मोटारसायकलने घरी येत असताना वाहणाच्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला होता. संभाजीनगर येथे उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रामेश्वर सुरेश वाघ (वय 22 रा. वरुड बुद्रुक) असे मृत तरुणाचे नाव आहे. भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील रामेश्वर सुरेश वाघ हा शुक्रवारी कामानिमित्त दुचाकीवरून पिंपळगाव रेणुकाई येथे आला होता. काम संपल्यानंतर रामेश्वर दुचाकीवरून रात्री ८ वाजेच्या सुमारास घराकडे परत निघाला. दरम्यान, पिंपळगाव परिसरात त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या रामेश्वरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सदर युवक ग्रामपंचायत कर्मचारी असल्याने त्यांचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणात परिचय होता. त्यांच्या या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. रामेश्वर वाघ यांच्या वडिलांचे दोन वर्षा पूर्वी अकाली निधन झाले होते. रामेश्वर घरातील सर्व कर्ता होता. रामेश्वर यांच्यामागे आई, एक भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT