Beed Accident News : भरधाव पिकअपने उडविल्याने तरुणाचा मृत्यू file photo
बीड

Beed Accident News : भरधाव पिकअपने उडविल्याने तरुणाचा मृत्यू

केज-धारूर महामार्गावर तांबवा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव पिकअपने धडक दिल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Youth killed after being hit by speeding pickup truck

केज, पुढारी वृत्तसेवा : केज-धारूर महामार्गावर तांबवा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव पिकअपने धडक दिल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

मृत तरुणाचे नाव वैभव इंद्रमोहन कराड (वय २६, रा. तांबवा, ता. केज) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव कराड हे तांबवा शिवारातील त्यांच्या शेताजवळ केज धारूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-सी लगत रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव वेगाने आलेल्या पिकअप (क्र. एमएच ४४/यू २२७०) ने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिकअप वाहनासह चालकाला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू असून, चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वैभव कराड हे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या साने गुरुजी निवासी विद्यालयाचे कर्मचारी इंद्रमोहन कराड यांचे सुपुत्र होते. त्यांच्या अकाली निधनाने तांबवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT