Beed Accident | केज तालुक्यात भरधाव पिकअपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

केज तालुक्यातील तांबवा येथे महामार्गालगत उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव पिकअपची जोरदार धडक
Kaij Taluka Speeding Pickup Truck Collision
वैभव इंद्रमोहन कराडPudhari
Published on
Updated on

Kaij Taluka Speeding Pickup Truck Collision

केज : केज तालुक्यातील तांबवा येथे महामार्गालगत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या २६ वर्षीय तरुणाला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वैभव इंद्रमोहन कराड (वय २६, रा. तांबवा) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी सुमारे ६ वाजता ते केज–धारूर महामार्गा लगत त्यांच्या शेताजवळील रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने (मद्यधुंद अवस्थेतील चालक असल्याची माहिती) त्यांना जोरदार धडक दिली.

Kaij Taluka Speeding Pickup Truck Collision
Beed vilas Ghule murder case : हॉटेल चालकाच्या हत्येनंतरच्या आंदोलनावरून बदनामी; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल

अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत वैभव कराड यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिकअप वाहनासह चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

वैभव कराड हे साने गुरुजी निवासी विद्यालयाशी संबंधित कर्मचारी इंद्रमोहन कराड यांचे पुत्र होते. त्यांच्या अपघाती निधनाने गावात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news