Beed News : लग्नाचे आमिष दाखवून बीड येथे तरुणीवर अत्याचार; लष्करात कार्यरत जवानाचे कृत्य file photo
बीड

Beed News : लग्नाचे आमिष दाखवून बीड येथे तरुणीवर अत्याचार; लष्करात कार्यरत जवानाचे कृत्य

देशसेवेत लष्करात कार्यरत असलेल्या एका जवानाने बीडमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Young woman sexually assaulted in Beed under the pretext of marriage; act committed by an army soldier

बीड, पुढारी वृत्तसेवा : देशसेवेत लष्करात कार्यरत असलेल्या एका जवानाने बीडमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संबंधित जवानावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कृष्णा सानप (रा. पौंडळ, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी जवानाचे नाव आहे. आरोपी कृष्णा सानप हा भारतीय लष्करात कार्यरत आहे. बीड येथे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीसोबत एका नातेवाईकाच्या मध्यस्थीने २०२४ मध्ये त्याची ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले; तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केले.

काही दिवसांपूर्वी आरोपी कृष्णा सानप याचा विवाह दुसऱ्या एका तरुणीसोबत ठरल्याची धक्कादायक माहिती पीडित तरुणीला मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने तात्काळ शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी जवानाची सध्या पठाणकोट येथे नियुक्ती असून, बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी पठाणकोट येथील लष्करी कार्यालयाला या गुन्ह्याची अधिकृत माहिती कळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपी लष्करी जवान पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतरच या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होतील. या प्रकरणाचा अधिक तपास पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक वनवे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT