Yogeshwari's Navratri : घटस्थापनेने होणार योगेश्वरीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ File Photo
बीड

Yogeshwari's Navratri : घटस्थापनेने होणार योगेश्वरीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ

राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या योगेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवास सोमवारी (दि.२२) घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Yogeshwari's Navratri festival will begin with Ghatasthapana

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवाः राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या योगेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवास सोमवारी (दि.२२) घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. याची जय्यत तयारी योगेश्वरीच्या मंदिरात सुरू आहे. या उत्सवानिमित्त दहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

सोमवारी सकाळी १० वाजता घटस्थापनेने या दसरा महोत्सवाला प्रारंभहोईल. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात देवीची शासकीय पूजा होईल. मंदिराच्या परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपात दररोज दुपारी १२ ते सायंकाळी सहा यावेळेत विविध महिला भजनी मंडळांच्या भजनाचे कार्यक्रम होतील. सायंकाळी सहाच्या नंतर गायन व कीर्तनाचे कार्यक्रम होतील. या कार्यक्रमासाठी मंदिर परिसरात मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

याच मंडपात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, भजन व किर्तन होणार आहे. बुधवारपासून (दि. २४) ते सोमवार (दि. २९) पर्यंत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांची रामकथा होणार आहे. या रामकथेचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन देवल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे, सचिव गिरध-ारीलाल भराडिया, उपाध्यक्ष अक्षय मुंदडा, उत्सव प्रमुख उल्हास पांडे, पूजा कुलकर्णी यांच्यासह सर्व विश्वस्तांनी केले आहे.

सोमवारी (दि. २२) सायंकाळी ६ ते ७यावेळेत मुंबईच्या असावरी देगलुरकर यांचे गायन होईल. रात्री ८ ते १० यावेळेत पुण्यातील रेवा नातु यांचे गायन होणार वाजता मुंबईच्या भाग्यश्री पाटील व ८.३० वाजता भाग्यश्री टिकले यांचे गायन होणार आहे. बुधवारी (दि. २४) सायंकाळी ५ वाजता लातूर येथील वृषाली कोरडे यांचे गायन, ६ वाजता पुणे येथील जयंत केजकर यांचे गायन होईल.

गुरुवारी (दि.२५) दुपारी ४ वाजता स्थानिक कलावंताचे गायन, सायंकाळी ६ वाजता पांडूरंग देशपांडे व सरोजिनी देशपांडे यांचे गायन आहे. मंगळवारी (दि. २३) सायंकाळी ७होईल. रविवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजता शिवकुमार मोहेकर यांचा 'जगदंबेचा गोंधळ' व जगविख्यात पखवाज वादक पंडित उध्दव आपेगावकर यांचे पखवाज वादन होईल. सोमवारी (दि. २९) दुपारी १ वाजता प्रा. रमेश सरवदे यांचा स्वरांजली, ४ वाजता अजय सुर्गावकर यांचे गायन, ५ वाजता पुणे येथील शुभदा देशपांडे यांचे गायन होईल.

बुधवारी (दि.१) नवमीच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता प्रकाश बोरगावकर प्रस्तुत 'जागर योगेश्वरी मातेचा' हा गायनाचा कार्यक्रम होईल. रात्री ७.३० पंचमवेद प्रतिष्ठानचे डॉ. विनोद निकम व अनुराधा निकम यांचा नृत्यभक्ती हा भरतनाट्यम चा कार्यक्रम होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT