Beed woman cinematic kidnapping  
बीड

Beed woman cinematic kidnapping |महिलेचे फिल्मी स्टाईलने अपहरण, ग्रामीण पोलिसांच्या धाडसामुळे अवघ्या काही तासांतच सुखरूप सुटका

woman cinematic kidnapping rescued by rural police- महिलेचे फिल्मी स्टाईलने अपहरण, ग्रामीण पोलिसांच्या धाडसामुळे अवघ्या काही तासांतच सुखरूप सुटका

पुढारी वृत्तसेवा

बीड, : शहरातील कल्याणीनगर भागातून एका महिलेचे पाच ते सहा इसम व दोन महिलांनी मारहाण करून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. डायल ११२ वर माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे व त्यांच्या पथकाने अत्यंत तत्परता दाखवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रायमोहा आणि पाटोदा परिसरात सापळा रचला.

पस्तीस वर्षीय महिलेचे शुक्रवार रोजी जबरदस्तीने चारचाकी वाहनातून नेण्यात आले होते. पोलिसांनी गोपनीय बातमीदाराच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पाटोदा तालुक्यातील एका महाराजांकडे गेलेल्या अपहरण कर्त्यांचा माग काढला.

अथक पाठपुराव्यानंतर पोलिसांनी महिलेची सुखरूप सुटका करत आरोपींना वाहनासह ताब्यात घेतले. ही धडक कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाळराजे दराडे, पोलीस हवालदार सतीश मुंडे, अतिश मोराळे व चालक पवार यांच्या पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT