केज : केज येथील एका ३० वर्षीय महिलेला तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बालाजी चव्हाण (रा.केज) याच्या विरूद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी, केज येथील भारत पेट्रोल पंपा जवळ राहत असलेल्या बालाजी चव्हाण याने एका वस्तीवर राहात असलेल्या तीस वर्षीय महिलेवर तिच्याशी लग्न करण्याचे खोटे आमिष दाखवून ती एकटी घरी असल्याचा गैरफायदा घेवून तिच्यावर त्याच्या केज येथील घरी आणि पुणे जिल्ह्यातील पिरंगुट (ता. मुळशी) येथे त्याच्या भाड्याच्या घरात मागील एक महिन्यापासून त्याने वारंवार लैंगिक अत्याचार केला. पुढील तपास पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.
बालाजी चव्हाण याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ओळखीचा गैरफायदा घेऊन आर्थिक अडचण असल्याने कारण सांगून एक तोळे सोन्याची चैन व दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स आणि तसेच नगदी ५० हजार रूपये असे एकूण दीड लाख रुपये लाटल्याचे तक्रारीत म्हटले आहे.