बीड : नोकरी लावण्याच्या बाता मारत २८ लाख ६५ हजार घेऊन भामटा पसार

भामट्याने सहा जणांना लावला चुना
Beed Job fraud news
भामट्याने सहा जणांना लावला चुना
Published on
Updated on

केज : आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाने भामट्याने सहा जणांची फसवणूक करून त्यांच्याकडून २८ लाख ६५ हजार रुपये उकळले. हा खळबळजनक प्रकार केजमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी लक्ष्मणआप्पा मलंगे या भामट्याविरूद्धात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Job fraud news
मैत्रिणीचे आक्षेपार्ह फोटो डिलीट न केल्याने ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाचा खून

याबाबत माहिती अशी, केज येथील भगवान बिभीषण गाडवे हे चहाचे हॉटेल चालवितात. २० ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांच्या ओळखीचे अंकुश दामोदर मोरे (रा. भालगाव ता. केज) यांनी त्यांना सांगितले की, त्यांच्या ओळखीचे जिंतूर येथील लक्ष्मणआप्पा वैजनाथआप्पा मुलंगे हे आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे काम करतात. त्यांची आरोग्य विभागातील गुप्ता नावाच्या एका बड्या साहेबांची ओळख आहे. तसेच अंकुश मोरे यांनी पण स्वतः त्यांच्या मुलाला नोकरी लावण्यासाठी दीड लाख रुपये मलंगे यांना दिले आहेत. त्यानंतर भगवान गाडवे व लक्ष्मण आप्पा मलंगे हे दोघे ६ नोव्हेंबर २०२२ रोजी केज येथे भेटले. त्यावेळी मलंगे याने नोकरीसाठी १२ लाख रुपये लागतील. त्यासाठी पहिल्यांदा काही रक्कम द्यावी लागेल,असे त्यांना सांगितले.

त्याने २० एप्रिल २०२३ रोजी गाडवे यांच्याकडे ५ लाख रूपये मागितले. परंतु गाडवे यांच्याकडे तेवढे पैसे नसल्याने त्यांनी २ लाख २५ हजार रुपये मलंगे याला घरी बोलावून दिली. यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेब सव्वासे होते. त्यानंतर एक ते दीड महिन्यात मुलाचे नाव यादीत नाव येईल, यादीत नाव आल्यानंतर पूर्ण पैसे द्या, असे म्हणत लक्ष्मण मलंगे पैसे घेऊन निघून गेला. त्यानंतर २७ एप्रिल २०२३ रोजी मलंगे याने पुन्हा त्यांना फोन केला. व तो मुंबईला गेला असल्याचे सांगत आरोग्य विभागातील एका टेबलवर देण्यासाठी ५० हजार रुपये लागतील असे म्हणत पैसे पाठवण्याची मागणी केली. त्यानंतर गाडवे यांनी त्याला मोबाईलवरून २५ हजार रुपये ऑनलाईन पाठविले.

त्यानंतर १६ मे २०२३ रोजी मलंगे याने पुन्हा गाडवे यांना कॉल करून आता अंतीम यादी लागणार असून त्यासाठी १५ हजार रूपये लागतील असे म्हणत पुन्हा १५ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. असे एकूण २ लाख ६५ हजार रुपये गाडवे यांनी मलंगे याला पाठविले.त्यानंतर मलंगे याने आपला फोन बंद करून ठेवला. त्यानंतर त्यांनी अंकुश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मलंगे याने आपल्याला दीड लाखाला फसवल्याचे सांगितले. तसेच मोरे यांच्या ओळखीचे नंदकुमार उत्तमराव भोसले, संजय अभिमन्यू पुजदेकर, सुशील बालासाहेब मडके, अरुण रावसाहेब डोबळे यांचीही नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचे सांगितले. त्यानंतर गांडवे यांनी केज पोलिसांत धाव घेत लक्ष्मणआप्पा मलंगे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बालासाहेब रोडे हे करत आहेत.

Beed Job fraud news
Like Aani Subscribe | व्लॅागर… खून… रहस्य?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news