आम्ही जनतेच्या सुख-दुःखात सदैव सोबत : आ. विजयसिंह पंडित file photo
बीड

Beed News : आम्ही जनतेच्या सुख-दुःखात सदैव सोबत : आ. विजयसिंह पंडित

या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून रणवीर पंडित युथ फाऊंडेशनची अधिकृत स्थापना करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

We are always with the people in their joys and sorrows. Vijay Singh Pandit

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या सामाजिक जाणिवेतून आमदार विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त रणवीर पंडित युथ फाऊंडेशनच्या सौजन्याने गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून रणवीर पंडित युथ फाऊंडेशनची अधिकृत स्थापना करण्यात आली.

आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून अनेकांच्या घरात सणासुदीच्या काळातही आर्थिक टंचाई जाणवत आहे. अशा कठीण प्रसंगी गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने किराणा किटचे वाटप करण्यात येत आहे.

या किराणा किटच्या माध्यमातून त्यांच्या घरात दिवाळीचा गोडवा आणि आनंद निर्माण व्हावा, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. समाजातील गरजू घटकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे. केवळ मदत करण्यापुरते नव्हे, तर त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही कुटुंबातील सदस्य म्हणून सदैव सोबत आहोत, अशी भावना रणवीर पंडित यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला आमदार विजयसिंह पंडित, युवानेते पृथ्वीराज पंडित, शारदा स्पोर्ट्स कॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष कालिदास नवले, नगरपरिषदेचे गटनेते शेख खाजाभाई, किशोर कांडेकर, अजय येवले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फाऊंडेशनचे सदस्य संदीप राजगुरू, संदीप मडके, आजिमभाई इनामदार, हसनुशेठ, राहुल काकडे, अमर बोराडे, राहुल मोटे, अजित काळे, अजय येवले, नवीद मशायक, किरण दाभाडे, बाळासाहेब दाभाडे यांच्यासह इतर सदस्य व मान्यवरांची उपस्थिती होती.

रणवीर पंडित युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून आगामी काळात आरोग्यसेवा, गरजू व वंचित घटकांना मदत, सामाजिक उपक्रम तसेच विविध जनहिताची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची सुरुवात यापूर्वीच झाली असून, काही दिवसांपूर्वी फाऊंडेशनचे सदस्य अजित काळे यांनी सुशी वडगाव येथे नागरिकांसाठी मोफत पाणी टँकर सेवा सुरू केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT