Beed News : धारूर तालुक्यातील सात गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा file photo
बीड

Beed News : धारूर तालुक्यातील सात गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा

तहसीलदारांसह अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी; नियमित पाणीपुरवठ्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

Water supply via tankers in seven villages of Dharur taluka

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटू लागल्याने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तालुक्यातील सात गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी तहसीलदार श्रीकांत निळे, गटविकास अधिकारी शेषेराव कांदे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी टँकर सुरू असलेल्या गावांना भेटी देऊन पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

यंदा पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील छोटे-मोठे तलाव आणि साठवण तलाव कोरडे पडले आहेत. अनेक गावांतील विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली तालुक्यातील सात गावात टँकर सुरू झाले आहे तर अनेक गावात विहीर इंधनबोर अधिग्रहण करण्यात आले आहेत. तसेच इतर पाण्याची अडचण असलेल्या गावांनी टँकरसाठी मागणी केल्यास लवकरात लवकर देण्यात येईल तसेच ज्या गावात पाणी उपलब्ध आहे ते अधिग्रहण करण्यासाठी ही उपायोजना सुरू आहेत असे तहसीलदार श्रीकांत निळे यांनी सांगितले.

असून काही ठिकाणचे जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांसह पशुधनाच्या पाण्याची गरज भागविणेही कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली जात होती. प्रशासनाने सात गावांत टँकर सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, टैंकर वेळेवर गावात पोहोचतो का, प्रत्यक्षात किती पाणी उपलब्ध होते आणि ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळते का, याची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पाणीपुरवठ्यात कोणतीही दिरंगाई होऊ नये, तसेच नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. यावेळी गोपाळपूर सरपंच प्रतिनिधी राजेश सोनवणे, प्रमोद सोळंके, उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT