Sand mafia : वाळूमाफियाचा तलाठ्यावर रॉडने हल्ला

गेवराई तालुक्यातील घटना; जखमी तलाठ्यावर उपचार सुरू
Sand mafia attack on talathi
Sand mafia : वाळूमाफियाचा तलाठ्यावर रॉडने हल्लाfile photo
Published on: 
Updated on: 

Sand mafia attacks Talathi with rod

बीड, पुढारी वृत्तसेवा गेवराई तालुक्यातील आहेर चिंचोली येथे कार्यरत तलाठ्यावर कार्यालयातच लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. वाळू माफियाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तलाठ्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ग्रामीण पोलिसांनी जवाब नोंदवला आहे.

Sand mafia attack on talathi
Beed News : खंडित ७३ शिक्षकांची यादीच शिक्षण उपसंचालक दातखिळ यांनी दडवली

विलास तपसे असे हल्ला झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. तपसे हे आहेर चिंचोली येथे कार्यरत आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांनी सिंदफणा नदीपात्रातून वाळू उपसा करण्याचे काही साहित्य जप्त केले होते. याचा राग मनात धरून संबंधित वाळूमाफिया बुधवारी दुपारी त्यांच्या आहेर चिंचोली येथील कार्यालयात आला. त्यावेळी माझे जप्त केलेले साहित्य परत करा असे तो म्हणू लागला.

यावर जप्त केलेले साहित्य असे परत करता येत नाही, असे तपसे यांनी त्याला सांगितले. याचा राग आल्याने त्या वाळू माफियाने तपसे यांच्या डोक्यात रॉड घातला तसेच मुक्का मार दिला. माझे साहित्य परत केले नाहीस तर तुला जीवे मारतो अशी धमकी देखील दिली. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपसे यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Sand mafia attack on talathi
Beed News : बीड जिल्ह्यातील सर्वाधिक दर : परळीच्या ओंकार साखर कारखान्याचा ३३५० ऊसदर जाहीर

या ठिकाणी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तपसे यांची भेट घेत प्रकृतीसंदर्भात माहिती घेतली. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी तपसे यांचा जवाब नोंदवला असून रात्री कम उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला दा नव्हता. परंतु महसूल कर्मचाऱ्यावर एक अशा प्रकारे हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.