दि. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., परळी  (Pudhari Photo)
बीड

Vaijnath Bank Election 2025 | वैद्यनाथ बँक निवडणूक 2025 सरासरी एकूण 37.5% मतदान

36 Polling Stations | निवडणुकीसाठी एकूण 36 ठिकाणी मतदान

पुढारी वृत्तसेवा

Beed Cooperative Bank Election

परळी वैजनाथ : वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज विविध ठिकाणी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडली. दुपारी चार वाजता मतदान संपले. या निवडणुकीसाठी सरासरी एकूण 37.5 टक्के इतके मतदान झाले आहे.

या निवडणुकीसाठी एकूण 36 ठिकाणी मतदान झाले. परळीपासून ते मुंबई पर्यंत असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. वैद्यनाथ बँक निवडणुकीसाठी एकूण 43 हजार 962 इतकी मतदार संख्या होती. प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी 16 हजार 287 इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण झालेल्या मतदानाची ही सरासरी 37.5 इतकी आहे. एकंदरीतच पाहता वैद्यनाथ बँकेच्या या निवडणुकीत मतदानाची नेहमीपेक्षा कमी टक्केवारी असल्याचे दिसून येते.

दरम्यान, वैद्यनाथ बँक निवडणुकीसाठी एकूण 17 जागा होत्या त्यापैकी चार जागा या अगोदरच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचे नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल ने जिंकलेल्या आहेत. उर्वरित 13 जागांसाठी आजची मतदान प्रक्रिया पार पडली. बँकेच्या मतदान केलेल्या 37.5 टक्के मतदारांनी कोणत्या उमेदवारांना प्राधान्य दिले हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दिनांक 12 ऑगस्ट रोजी बीड येथे या निवडणुकीची मतमोजणी होणार असुन त्यानंतर वैद्यनाथ बँक संचालक मंडळावर कोण कोण आले हे चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT