Unseasonal rains cause damage to agriculture in Dhondarai area
धोंडराई : पुढारी वृत्तसेवा
गेवराई तालुक्यातील बऱ्याचशा गावात पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या सततच्या पावसामुळे शेती कामांना ब्रेक लागाला आहे. नांगरलेल्या शेताची किंवा उभ्या पळाट्या मोगडा, औत, नागरट, ऊस पिकातली मशागत, उसाला माती लावणे, सरी पाडणे, फुल्या पाडणे यासारखी कामे रखडली आहेत.
तालुक्यातील धोंडराई परिसरातील शेतकऱ्यांची उन्हाळी बाजरी पिके घेतली होती. ही बाजरी एकदम जोमात आली होती. या बाजरीचे आता खालून कापनी काढून एका जागेवर बुचाड घातले आहे. त्या बुचडाला सततच्या पडणाऱ्या पावसाने बाजरी पिकाला कोंब (कर) फुटले आहेत. शेतकरी मात्र निसर्गाच्या या अवकृपेमुळे हतबल झाला आहे.
मार्च-एप्रिल महिन्यामध्ये पैठण उजवा कालव्याला पाणी रोटेशन पद्धतीने असल्याने विंधन विहिर बोर यांना भरपूर प्रमाणात पाणी होते. कालव्याचे सुद्धा पाणी शेतीला भेटत असताना याच कालव्याच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी पीक घेतली होती. ती मागच्या दोन ते तीन महिन्यात जोमात आली होती. तिची आता खालून कापून काढणे झाल्याने तिचे खळ करण्याच्या वेळेत आल्याने मागील काही दिवसांपासून सततच्या पडणाऱ्या पावसाने या बुचड घातलेल्या बाजरीला उभ्या बुचाडाला कोंब फुटून आले आहेत.
नामदेव पवळ शेतकरी धोंडराईमागच्या दहा-बारा दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने शेती काम करता येईनात. मेहणती रखडल्याने मृग नक्षत्रावर पेरणी होईल की नाही किंवा कापसाची लागवड होईल का नाही हे आत्ताच सांगणे मुश्किल झाले आहे. मी माझ्या शेतामध्ये मागच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी दोन एकर बाजरीचे पीक पेरले होते. ती बाजरी आता कापणी करून खळ करण्याच्या तयारीत असताना लागून राहिलेला पाऊस या पावसामुळे या काढलेल्या बाजरीला शेतात आम्ही बुचाड उभा केले होते. त्या बुचडालाच आता कोब फुटले असून आता त्याचा काहीही फायदा नाही. ते पूर्ण पीक बाजरी वाया गेली आहेत. त्या दोन एकर शेतामध्ये मला जवळपास २५ गोण्या बाजरी झाली असती. माझं साल कडीला गेला असता, पण या पावसाने हाता तोंडचा घास हिरावून घेतल्याने त्यामध्ये अधिकचे नुकसान झाले आहे.