Unknown man found dead body
गेवराई: गेवराई तालुक्यातील टाकळगाव शिवारातील बंधाऱ्यात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे वयोगटातील या पुरुषाच्या अंगावर काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व निळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट आहे.
सदर मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे कोणाला या व्यक्तीची ओळख असल्यास त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे, गेवराई येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले असून ९८२२३५२२८१, ९८२२५३३८५७, (०२४४२) २६२१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे