प्रज्ञाशोध परीक्षेत दोन हजार विद्यार्थी सहभागी file photo
बीड

Beed News : प्रज्ञाशोध परीक्षेत दोन हजार विद्यार्थी सहभागी

बीड जिल्हा इतिहास परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बीड जिल्हा प्रज्ञ-ाशोध परीक्षेला मोठा प्रतिसाद मिळाला असून बीड तालुक्यातील विविध शाळांमधून सुमारे दोन हजार शालेय विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Two thousand students participated in the Pragya Shod exam

बीड, पुढारी वृत्तसेवाः बीड जिल्हा इतिहास परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बीड जिल्हा प्रज्ञ-ाशोध परीक्षेला मोठा प्रतिसाद मिळाला असून बीड तालुक्यातील विविध शाळांमधून सुमारे दोन हजार शालेय विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले आहेत. ही परीक्षा बीडचे आद्य इतिहासकार डॉ. सतीश साळुंके लिखित 'गोष्ट बीड जिल्ह्याच्या इतिहासाची' या शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे.

ही प्रज्ञाशोध परीक्षा येत्या ७फेब्रुवारी २०२५ रोजी सहभागी शाळांमध्येच घेण्यात येणार असल्याची माहिती बीड जिल्हा इतिहास परिषदेचे कार्यवाह अण्णासाहेब गडदे यांनी दिली. या उपक्रमांतर्गत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना तसेच बीड तालुक्यातील सुमारे चारशे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना हे पुस्तक बीड जिल्हा इतिहास परिषदेच्या वतीने विनामूल्य वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा सध्या केवळ बीड तालुक्यापुरती मर्यादित असतानाही तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अर्थसहाय्य केले आहे.

येत्या काळात जिल्हास्तरावर सुमारे वीस हजार विद्यार्थी या प्रज्ञाशोध परीक्षेत सहभागी होतील, असा अंदाज पुरातत्त्वविद अण्णासाहेब गडदे यांनी व्यक्त केला. या परीक्षेतील सर्व प्रश्न बीड जिल्ह्याच्या इतिहासावर आधारित असणार असून, 'गोष्ट बीड जिल्ह्याच्या इतिहासाची' या पुस्तकातील आशयावरच तयार करण्यात येणार आहेत.

या पुस्तकात १४ क्यूआर कोडद्वारे जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्राचीन व मध्ययुगीन स्थळांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्याच्या इतिहासाची साधने, बीड शहराच्या वेशी, तटबंदी व किल्ले यांची अभ्यासपूर्ण माहितीही या पुस्तकात समाविष्ट आहे. या उपक्रमाबद्दल सहभागी विद्यार्थ्यांनी पुस्तक अत्यंत आवडल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

परीक्षेच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या बीड शहर व तालुक्यातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचे बीड जिल्हा इतिहास परिषदेच्या वतीने आभार मानण्यात आले असून, पुस्तकाचे लेखक इतिहासकार डॉ. सतीश साळुंके यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT