Two farmers consumed poison right in front of the police in Beed district
बीड, पुढारी वृत्तसेवा : पवनचक्की कंपनीने विना परवानगी त्यांची वाहने शेतातून नेल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने त्यांना जाब विचारला. यावेळी पोलिसांनी या शेतकऱ्यांना रोखल्यामुळे दोन शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. या दोन्ही शेतकऱ्यांवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जिल्हा प्रदीप भालचंद्र कदम (वय 25) आणि दादासाहेब सुंदर धस (वय 40, दोघे रा. सौदाना, ता. पाटोदा) असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. सौदाना येथील गट क्रमांक 340 मध्ये प्रदीप कदम आणि अक्षय कदम यांच्या कुटुंबाचे साधारण सहा एकर शेतजमीन आहे. या शेतातून गेल्या चार वर्षांपासून सन पॉवर पवनचक्की कंपनीचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना किंवा त्यांना कोणताही योग्य मोबदला अन् विश्वासात न घेता कंपनीकडून मनमानी पद्धतीने कामे रेटली जात आहेत.
मंगळवारी, 29 सप्टेंबर रोजी पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता थेट त्यांच्या खासगी शेतातून लोडिंग वाहने नेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पिकांचे नुकसान होत असल्याचे पाहून आणि हक्काच्या शेतातून विनापरवानगी वाहने जात असल्याने अक्षय कदम, प्रदीप कदम आणि दादासाहेब धस यांनी कंपनीची वाहने अडवून जाब विचारला. यावरून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना अरेरावी करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
शेतकऱ्यांनी वाहने अडवल्याची माहिती मिळताच पाटोदा पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार वाघ हे निष्पक्ष भूमिका घेण्याऐवजी थेट पवनचक्की कंपनीच्याच गाडीत बसून घटनास्थळी दाखल झाले. कंपनीच्या दबावाखाली येऊन पोलीस अंमलदार वाघ यांनी तेथे उपस्थित असलेल्या अक्षय कदम आणि प्रदीप कदम यांच्याशी उद्धट वर्तन केले.
एवढ्यावरच न थांबता अंमलदार वाघ यांनी अक्षय आणि प्रदीप यांच्या कानशिलात मारून त्यांना अमानुष मारहाण केली. खासगी कंपनीच्या फायद्यासाठी पोलीसच आपल्यावर अत्याचार करत आहेत आणि आपल्या हक्काच्य शेतातच आपल्याला मारहाण केल जात आहे, या भावनेने दोन्ही शेतक प्रचंड हादरले. पोलीस आणि पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्य या अन्यायकारक व अपमानास्प वागणुकीचा प्रचंड राग आल्याने प्रदी भालचंद्र कदम आणि दादासाहेब सुंद धस यांनी घटनास्थळीच विषारी द्रन प्राशन केले.
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू; प्रकृती स्थिर शेतकऱ्यांनी विष प्राशन करताच पोलीस आणि उपस्थितांचे धाबे दणाणले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने दोन्ही शेतकऱ्यांना पवनचक्की कंपनीच्याच वाहनातून पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास त्यांना अधिक उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या दोन्ही शेतकऱ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.