Beed News : वर्क ऑर्डर होऊनही तीन महिने उलटले; रस्ता-नालीचे काम रखडले  file photo
बीड

Beed News : वर्क ऑर्डर होऊनही तीन महिने उलटले; रस्ता-नालीचे काम रखडले

₹९९.९९ लाखांचा निधी मंजूर; काम सुरू करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Three months have passed since the work order was issued; road and drainage work remains stalled

बीड, पुढारी वृत्तसेवाः बीड शहरातील भाग्यनगर परिसरातील पारनेरकर महाराज सभागृह ते गीते हॉस्पिटल व डॉ. अरुण भस्मे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ₹99 लाख 99 हजार 924 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची अधिकृत वर्क ऑर्डर एप्रिल महिन्यात काढण्यात आली. मात्र, जवळपास तीन महिने

उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. संबंधित कामाचा ठेका कंत्राटदाराला देण्यात आला असला, तरी अद्याप काम सुरू झालेले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

त्यामुळे परिसरातील रहिवाशांना धूळ, चिखल, वाहतुकीतील अडथळे तसेच दैनंदिन गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर भाग्यनगर परिसरातील नागरिकांनी रस्ता व नालीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

विकासकामांमध्ये विलंब थांबवून मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. याबाबत प्रा. सनी विष्णू वाघमारे यांनी जिल्हाधिकारी तसेच बीड नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन काम सुरू करण्याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT