बीड : एकाच दिवसात तीन लाचखोर पकडले Pudhari File Photo
बीड

बीडमध्ये एकाच दिवसात तीन लाचखोर पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीडमध्ये एकाच दिवशी तीन लाच घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अंगणवाडी सेविकाचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यावेळी पैशाची मागणी करणार्‍या एकात्मक बाल विकास सेवा योजना विभागातील दोन महिला अधिकार्‍यांना पकडण्यात आले. तर गोठवलेले बँक खाते पुर्ववत करण्यासाठी अडीच लाख रुपयांची रक्कम स्विकारण्याचे मान्य करुन मिळवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यास पकडण्यात आले.

आष्टी तालुक्यातील मलकापुर वस्तीवरील अंगणवाडीचा पर्यवेक्षिका अमृता हट्टे व निता मालदोडे यांनी दिलेल्या सकारात्मक अहवालामुळे मिनी अंगणवाडी वर्धित होवून मोठी अंगणवाडी झाली. यामुळे सदर ठिकाणच्या अंगणवाडी सेविकेस या दोन्ही महिला अधिकार्‍यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार मालदोडे यांनी पाच हजार रुपये लाच स्विकारतांना शुक्रवारी (दि.2) रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघींविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा सापळा बीडमध्ये यशस्वी झाला. यात बीडच्या सायबर पोलिस ठाण्यातील आशिष वडमारे याने तक्रारदाराकडून बॅटरी व इन्व्हर्टर खरेदी केल्या होत्या. त्याचे बील देखील आरोपीने अदा केले होते. परंतु यानंतर तक्रारदाराचे पंजाब नॅशनल बँकेतील खाते सायबर पोलिस ठाण्याकडून गोठवण्यात आले होते. सदर बँक खाते पुर्ववत करण्यासाठी वडमारे यांनी पंचासमक्षक 3 लाख 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 2 लाख 50 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले तसेच ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला म्हणून त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, भरत गारदे, अविनाश गवळी, अंबादास पुरी, निकाळजे, गणेश मेहत्रे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT