Thieves break into farmer's house in Bagpipalgaon
गेवराई : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील बागपिपळगाव येथील एका शेतक-याचे अज्ञात चोरट्यांनी घर फोडुन सोन्याची पोत व नगदी ८ हजार असा ५० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना (बुधवार) रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी घटनेचा पोलीसांनी पंचनामा केला असुन या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
गणपत खरात राहणार बागपिपळगाव असे चोरी झालेल्या शेतक-याचे नाव असुन ते बुधवार रोजी रात्री नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. बुधवार मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास बाजुला असलेल्या दुस-या खोलीचे अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी पेटी चोरटे घेवुन गेले. बाजुला असलेल्या भिमराव लगड याच्या शेतात फोडुन पेटी मधील ४० हजारांची सोन्याची पोत व नगदी ८ हजार रूपये असा ५० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
हि घटना गुरूवार रोजी सकाळी घरातील लोक उठल्यावर लक्षात आली. लगेच पोलीसांना घटनेची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी बीट अंमलदार रामनाथ उगलमुगले यांनी घटनेचा पंचनामा केला असुन या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या चोरीचा तपास पोलीसांनी तातडीने लावावा अशी मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे.