Beed News : सुट्टी संपली; आजपासून शाळांची घंटा वाजणार! file photo
बीड

Beed News : सुट्टी संपली; आजपासून शाळांची घंटा वाजणार!

दिवाळीच्या सणानिमित्त विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रदीर्घ सुट्ट्या संपल्या असून, र सोमवार, दि. 23 नोव्हेंबरपासून बीड जिल्ह्यातील शाळा पुन्हा नियमितपणे सुरू होणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

The holidays are over; the school bell will ring starting today!

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या सणानिमित्त विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रदीर्घ सुट्ट्या संपल्या असून, र सोमवार, दि. 23 नोव्हेंबरपासून बीड जिल्ह्यातील शाळा पुन्हा नियमितपणे सुरू होणार आहेत. तब्बल न वीस दिवसांच्या सुट्टीनंतर शाळेची घंटा पुन्हा वाजणार असल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरणात नवचैतन्य निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांसह न शिक्षकांनाही आता पुन्हा शैक्षणिक कामकाजाला 3 सुरुवात करावी लागणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या नियोजनानुसार र बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार, दि. 2 न नोव्हेंबर ते शनिवार, दि. 21 नोव्हेंबर या कालावधीत न दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर रविवार, दि. 22 नोव्हेंबर रोजी साप्ताहिक सुट्टी जिल्हा परिषद मध्यवर्ती प्राथमिक शाळा असल्याने सोमवारपासून प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत.

दिवाळीच्या सुट्टयांमध्ये विद्यार्थ्यांनी कुटुंबीयांसोबत सणाचा आनंद घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी गावाकडे जाऊन नातेवाईकांच्या भेटीगाठी घेतल्या, तर काहींनी पर्यटन आणि विविध उपक्रमांमध्ये सुट्टीचा आनंद लुटला.

आता सुट्ट्यांचा काळ संपल्याने पुन्हा दप्तर, पुस्तके, वह्या आणि अभ्यासाची लगबग सुरू होणार आहे. पालकांकडूनही मुलांच्या शाळेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट दिवाळीच्या सुट्टयांमुळे गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या शाळांचे परिसर सोमवारपासून पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. मित्र-मैत्रिणींच्या भेटी, सुट्टीतील आठवणींची देवाणघेवाण आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने शाळांमधील नियमित दिनक्रम पुन्हा सुरू होणार आहे.

दरम्यान, सुट्टीनंतर शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थित राहावे, तसेच पालकांनी मुलांना वेळेत शाळेत पाठवावे, असे आवाहन शाळा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा शाळेची घंटा विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या प्रवासासाठी साद घालणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT