Sand Mafia : पोलिसांची वाळूमाफियांवर धडाकेबाज कारवाई, दोन टिप्पर, ट्रॅक्टर लोडरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त!

छत्रबोरगावात वाळूमाफियांना ५१ लाखांचा दणका; दोन टिप्पर, ट्रॅक्टर लोडरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त!
beed crime news
पोलिसांची वाळूमाफियांवर धडाकेबाज कारवाई, दोन टिप्पर, ट्रॅक्टर लोडरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त!file photo
Published on: 
Updated on: 

Police launch a major crackdown on the sand mafia; two tipper trucks, a tractor-loader, and goods worth lakhs seized!

माजलगाव : वृत्तसेवा माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून, आता वाळूमाफियांना पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवकते यांनी छत्रबोरगाव येथील गोदावरी नदीपात्रात धडाकेबाज कारवाई करत तब्बल ५१ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या टोळक्यात एकच खळबळ उडाली आहे.

beed crime news
shukra gochar : शुक्राचा तूळ राशीत प्रवेश, ४० दिवस 'या ४ राशींवर होणार धनवर्षाव

मिळालेल्या माहितीनुसार, मौजेछत्रबोरगाव येथील गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना गौण खनिज वाळूचा उपसा करून त्याची चोरटी विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक विजय रामोड यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक देवकते यांच्यासह पोलीस पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत छापा मारला असता, तेथे वाळू उपसा आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी दोन टिप्पर वाहने व एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर लोडर आढळून आला. पोलिसांनी एक पिवळ्या-राखाडी रंगाचा हायवा टिप्पर (किंमत ३६ लाख रुपये), त्यातील पाच ब्रास वाळू (किंमत ३० हजार रुपये), दोन ब्रास वाळू असलेला अशोक लेलँड टिप्पर (किंमत ८ लाख रुपये) आणि वाळू भरण्यासाठी वापरला जाणारा महिंद्रा ट्रॅक्टर लोडर (किंमत ७ लाख रुपये) असा एकूण ५१ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक देवकते, पोलीस अंमलदार काळे, जाधव, बहीरवाळ, शेंडगे आणि उघडे यांनी सहभाग घेतला.

beed crime news
Gupt Daan : कोणत्या वस्तूंचे गुप्तदान केल्याने मिळते पुण्य? जाणून घ्या योग्य पद्धत

एकीकडे अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याची चर्चा सुरू असतानाच, आता थेट गोदावरीच्या पात्रातील वाळूचोरांवर कारवाई झाल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. एपीआय देवकते यांच्या कारवाईचा धडाका सुरूच असल्याचे या कारवाईतून दिसून आले. पुढील पोलीस तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.