Crime News
महिलेला तरुणाकडून गुप्तांग दाखवून अश्लील शिवीगाळ  File Photo
बीड

केज : निर्लज्जपणाचा कळस! महिलेला तरुणाकडून गुप्तांग दाखवून अश्लील शिवीगाळ

पुढारी वृत्तसेवा

केज, पुढारी वृत्तसेवा : केज येथील होळमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शेतात काम करत असलेल्या महिलेला अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच त्या महिलेला गुप्तांग दाखवून लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे.

होळ येथे हा प्रकार शनिवारी (दि.13) सकाळी घडला. महिला तिच्या जनावरांसाठी स्वतःच्या शेतात गवताची कापणी करीत होती. त्याच वेळी त्यांच्या शेताच्या शेजारील इसम तेथे आला. त्याने कुणाचे नाव न घेता अश्लील भाषेत शिवीगाळ सुरु केली. त्या महिलेने त्याच्या शिवीगाळीकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्याने त्या महिलेच्या पतीच्या नावाने अश्लील शिवीगाळ सुरु केली. म्हणून ती महिला त्याला म्हणाली की, विनाकारण शिव्या देऊ नको. असे म्हणताच त्याने आपले गुप्तांग काढून महिलेला दाखविले आणि पुन्हा शिवीगाळ सुरु केली.

यानंतर महिला घाबरून घरी गेली आणि हा घडलेला प्रसंग तिच्या नवऱ्याला आणि मुलांना सांगितला. त्यानंतर महिलेने युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून त्या विकृत मानसिकतेच्या नराधमा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सिरसट हे पुढील तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT