Beed Heavy Rain : शेतकऱ्याला तहसीलदार गिड्डे यांनी दिला ऑन दी स्पॉट मदतीचा धनादेश  File Photo
बीड

Beed Heavy Rain : शेतकऱ्याला तहसीलदार गिड्डे यांनी दिला ऑन दी स्पॉट मदतीचा धनादेश

चिखल, पाण्यातून काट्याकुट्याचा रस्ता तुडवीत तहसीलदार धावले शेतकऱ्यांच्या मदतीला

पुढारी वृत्तसेवा

Tehsildar Gidde gave a cheque for on-the-spot assistance to the farmer

गौतम बचुटे

केज: विविध राजकीय पक्षाचे पुढारी आणि नेते हे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलास देऊन त्यांचे मनोबल वाढवून मानसिक आधार देण्याचे काम करीत आहेत. तसेच केजचे तहसीलदार यांनी सुद्धा चिखल तुडवीत आणि पाण्यातून काट्या कुट्याचा रस्ता दुडवीत शेतकयांच्या नुकसानीची पाहणी करून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल शामनाला पाठवीत आहेत.

केज तालुक्यातील एका शेतकन्यांचे म्हशी आणि गाय पाण्यात अडकलेली असताना त्यांना वाचविण्यासाठी दिवसभर आटोकाट प्रयत्न करूनही त्यातील तीन जनावरे दगावली, त्या शेतकऱ्याला तहसीलदार यांनी ऑन दी स्पॉट मदतीचा धनादेश देऊन दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. केज तालुक्यात झालेल्या अतिवृ‌ष्टीमुळे शेतक-यांची पिके पाण्याखाली गेलेली असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसगनि हिरावला आहे. तसेच मांजरा नदी पट्ट्यातील शेतक-यांचे तर प्रचंड नुकसान झालेले आहे. राजेगाव, दहिंटना, बोरगाव, भोपला, हदगाव, डोका, लाखा, सुर्डी, सोनेसांगवी, नायगाव, इस्थळ या गावातील पिके पूर्णतः पाण्याखाली आहेत. अशा परिस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते रमेश आडसकर, आ. मुंदडा यांचे यजमान अक्षय मुंदडा, विष्णू पुले हे नुकसानीची पाहणी करीत शेतकयांना दिलासा देत आहेत, दरम्यान फेजने तहसीलदार राकेश गिड्ढे हे स्वतः अतिवृष्टी आणि नुकसानग्रस्त भागात चिखल तुडवीत आणि पाण्यातील काटया कुट्याचा रस्स्थाने शेतक-यांच्या भेटीला जात आहेत.

दिनांक २३ सप्टेंबर रोजी मांगवडगाव येथील तेलेवस्ती वरील शेतकरी महादेव लक्ष्मण चादर हे शेतात जनावरे चारण्यासाठी गेले असताना अचानक पाणी वाढले आणि त्या पाण्यात त्यांची दोन म्हशी, गाय आणि वासरू अडकले होते. ही माहिती ग्राम महसूल अधिकारी यांनी तहसीलदार राकेश गिड्डे यांना दिल्या नंतर स्वतः तहसीलदार गिड्डे तेथे पोहोचले परंतु पाण्याचा प्रवाह जोरात बाहत असल्याने जनावरापर्यंत जाणे शक्य नव्हते. त्या नंतर दिनांक २४ सप्टेंबर रोजी पुन्हा तहसीलदार गिड्ढे तेलेवस्तीवर पोहोचले मात्र यावेळी एक गाय वाचविष्यात यश आले मात्र दोन म्हशी आणि एक वासरू याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तहसीलदार राकेश गिते यांनी घटनास्थली ऑन दी स्पॉट महादेव चादर यांना ९५ हजाराचा नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचा चनादेश त्यांना सुपूर्त केला.

डोळ्यात अबू आणि कंठ दाटला तेलेवस्ती वरील शेतकरी महादेव लक्ष्मण चादर यांचे दोन म्हशी व वासरू दगावला नंतर त्यांना मदतीचा धनादेश देत असताना डोळ्या देखत जनावरे मृत्युमुखी पडल्याने शेतकरी धाय मोकलून रडत असलेला बघून तहसीलदार देखील भावनिक झाले.

बोरगाव येथे शेतकऱ्याने केली आत्महत्या। उभे पीक पाण्यात घेण्यामुळे भावनाविवश झालेल्या बोरगाव येथील शेतकरी रमेश ज्ञानोबा गव्हाणे या ६२ वर्षाच्या शेतकन्याने विद्युत तारेला स्पर्श करून जीवन संपविले.

सोयाबीनची गंज वाहून गेली गावात पाणी लाखा येथील रघुनाथ माणिक रामिष्ठ या शेतकऱ्याने काढून ठेवलेल्या सोयाबीनची गंज डोळ्या देखत वाहून गेली, तर गावातील घरात पाणी शिरले आहे.

वहिटना कॉबड्या वाहून नेल्या वहिटना येथे विजयकुमार कातमांडे यांच्या पोल्ट्री शेडमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे शेडमधील २ ते ३ हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोवेसांगवी येथे म्हैस वाहून गेली सोबेसांगवी येथील शेतकन्याची देखील म्हैस वाहून गेली आहे.

सुर्डी येथे म्हैस मृत्युमुखी। सुर्डी करण्यात येथील गणेश अंकुशे या शेतक-याची म्हैस पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT