Theft  Pudhari
बीड

Beed News : उमापुरातील सूरज बिअर बारवर पुन्हा दरोडा

सहा लाखांची वाईन केली लंपास

पुढारी वृत्तसेवा

Suraj Beer Bar in Umapur Robbed Again

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उमापूर येथील सूरज बिअर बार रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल ५ ते ६ लाखांची वाईन लंपास केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे चोरट्यांचे हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या असून, पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी कॅमेरेही फोडल्याचे समोर आले आहे.

मिळाल ल्या माहितीनुसार, गुरुवार (दि.२८) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हॉटेलच्या पाठीमागील बाजूने प्रवेश केला. त्यांनी प्रथम खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि त्यानंतर शटर उचकटून गोडाऊनमधील महागड्या वाईनच्या बॉक्सवर हात साफ केला. या चोरीत अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, विशेष बाब म्हणजे गेल्यावर्षीही याच हॉटेलमध्ये चोरीची घटना घडली होती. त्या वेळी तब्बल १० लाख रुपयांचा माल चोरीला गेला होता.

त्यामुळे एकाच ठिकाणी पुन्हा चोरी झाल्याने पोलिसांच्या तपास कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. घटनेची माहिती मिळताच उमापूर व चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT