Beed News : डोंगरे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे File Photo
बीड

Beed News : डोंगरे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे

मुख्यमंत्री फडणवीसांकडून ५ लाखांची घोषणा, पंकजाताई मुंडेंकडून भरघोस मदत

पुढारी वृत्तसेवा

Sugarcane worker Ganesh Dongre died in an unfortunate accident Chief Minister Fadnavis announces Rs 5 lakh

वडवणी, पुढारी वृत्तसेवाः वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र या संकटाच्या काळात डोंगरे कुटुंबाच्या पाठीशी शासन आणि लोकप्रतिनिधी खंबीरपणे उभे राहिले असून, एकामागून एक मदतीचे हात पुढे येत आहेत.

पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मी कायम डोंगरे कुटुंबासोबत आहे, असे ठाम आश्वासन देत कुटुंबाला मोठा दिलासा दिला. त्यांनी दूरध्वनीवरून डोंगरे कुटुंबीयांशी संवाद साधत या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. खरंच खूप वाईट झालं, मुलींची काळजी घ्या. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे.

काहीही लागल्यास नक्की सांगा. मी लवकरच प्रत्यक्ष भेट घेईन आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे भावनिक शब्द त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार माजी आमदार केशवराव आंधळे व गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेचे नेते कृष्णा तिडके यांच्या हस्ते डोंगरे कुटुंबीयांना तातडीची व भरघोस आर्थिक मदत पोहोचविण्यात आली.

या मदतीच्या वेळी गणेश डोंगरे यांच्या पत्नी अश्विनी डोंगरे यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून माजलगावचे भूमिपुत्र व आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी डोंगरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात येत असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली.

या दुर्दैवी घटनेची माहिती डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना मोबाईल संदेशाद्वारे दिली होती. प्रचार व प्रवासाच्या व्यस्ततेत असतानाही संवेदनशीलतेचे दर्शन घडवत मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत मंजूर केली. नेतृत्वाच्या संवेद नशील भूमिकेमुळे 'गरिबाच्या दुःखात शासन सोबत उभे असते' याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

यावेळी भाजपाचे माजी आमदार केशवराव आंधळे, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेचे नेते कृष्णा तिडके, माजी सभापती दिनकरराव आंधळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय आंधळे, वैभव महिंद्रकर, सोमनाथ बडे, बनसीधर मुंडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव रेडे, डी.सी.सी. बँक संचालक आमोल आंधळे, ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री, तसेच ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. सोळंकेंकडून १ लाखाची मदत

सोबत उभे असते' याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. यावेळी भाजपाचे माजी आमदार केशवराव आंधळे, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेचे नेते कृष्णा तिडके, माजी सभापती दिनकरराव आंधळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय आंधळे, वैभव महिंद्रकर, सोमनाथ बडे, बनसीधर मुंडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव रेडे, डी.सी.सी. बँक संचालक आमोल आंधळे, ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री, तसेच ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील गणेश डोंगरे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात डोंगरे कुटुंबीयांना आ.प्रकाश सोळंके यांनी भेट देऊन सांत्वन केले. तसेच स्वतः १ लाख रुपयांची आर्थिक मदत देखील दिली. याबरोबरच शासनाकडून या कुटुंबाला मदत मिळवून देण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत सर्जेराव काळे, कल्याणराव आबूज, बजरंग साबळे, शेषराव जगताप, बाबरी मुंडे, अॅड. माधव शेंडगे, गणेश म्हेत्रे, विकास मुंडे, राहुल चिंचकर, सतीश खोटे, आबेद शेख, विलास बडणे, अंगद घुगे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT