Knife Attack : शेतीच्या वादातून चाकूने प्राणघातक हल्ला; एक गंभीर, पाचजण जखमी Pudhari File Photo
बीड

Knife Attack : शेतीच्या वादातून चाकूने प्राणघातक हल्ला; एक गंभीर, पाचजण जखमी

केज तालुक्यातील शिरूर घाट येथे शेतीच्या वादावरून एकावर चाकूने प्राणघातक हल्ला केला असल्याने एकजण गंभीर जखमी असून अन्य चौघे देखील जखमी झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Stabbing attack over agricultural dispute; One Critical, Five Injured

केज, पुढारी वृत्तसेवा: केज तालुक्यातील शिरूर घाट येथे शेतीच्या वादावरून एकावर चाकूने प्राणघातक हल्ला केला असल्याने एकजण गंभीर जखमी असून अन्य चौघे देखील जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

शिरूर घाट तालुका केज येथील राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ सुभाष सांगळे यांनी त्यांच्या शेतात विहीर खोदकाम केले असून त्याने विहिरीचे खोदकाम करताना त्याने विहिरीच्या अर्धा हिस्सा हा त्याचे चुलते भीमराव रामभाऊ सांगळे यांच्या शेतात खोदकाम केले आहे. त्या कारणावरून राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ सांगळे हा त्याचे चुलते भीमराव सांगळे, चुलतभाऊ मोहन सांगळे आणि चुलते अर्जुन सांगळे यांना काठीने मारहाण केली त्यात भीमराव सांगळे याच्या डोक्यात मार लागल्याने ते जखमी झाले होते. तसेच राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ सांगळे याने चुलत भाऊ मोहन आणि चुलते अर्जुन या दोघांनाही पायावर काठीने मारून जखमी केले.

हे भांडण सुरू असताना शेजारी राहत असलेले सुंदर धनराज सांगळे व त्यांचा मुलगा बालाजी सुंदर सांगळे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ याने त्यांच्यावरील मागील भांडणाचा राग मनात धरून त्याने सुंदर सांगळे यांच्या पोटात चाकू खुपसला. या चाकू हल्ल्यात सुंदर सांगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्याचा मुलगा बालाजी सांगळे हा देखील जखमी झाला आहे. सुंदर सांगळे यांच्या पोटात चाकूचा खोलवर मार लागला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्यांना बीड येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

दरम्यान प्राणघातक हल्ला झालेले सुंदर सांगळे यांचा मुलगा बालाजी सांगळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भांडणात सुंदर सांगळे यांच्यासह त्यांचा मुलगा बालाजी सांगळे, भीमराव सांगळे, मोहन सांगळे आणि अर्जुन सांगळे असे एकूण पाचजण जखमी झाले आहेत.

पोलिसांची तीन पथके रवाना; आरोपी ताब्यात

आरोपी राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ सांगळे हा घटनेनंतर पळून गेला होता. ही माहिती पोलिस निरीक्षक स्वप्नील त्यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिक्षक, उमेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी तीन पोलिस पथके रवाना केली होती. त्या पथकात पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे, पोलिस उपनीक्षक बाळासाहेब रोडे, बाळासाहेब अहंकारे, त्रिंबक सोपने, तांबारे, शिवाजी कागदे, उमेश आघाव, संतोष गिते, सिद्दिकी, शाहा यांचा समावेश होता. आरोपी राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ हा चाकू हल्ला केल्यानंतर फरार होण्याच्या प्रयत्नात असताना त्याला तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशन याचा शोध घेऊन पोलिसांनी नदी नाल्यातून पाठलाग करून ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT