Accident News : भरधाव वेगातील बसची दोन वाहनांना धडक file photo
बीड

Accident News : भरधाव वेगातील बसची दोन वाहनांना धडक

केजजवळील घटना; तिन्ही वाहनांचे चालक जखमी

पुढारी वृत्तसेवा

Speeding bus collides with two vehicles

केज, पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाईहून केजकडे जाणाऱ्या बसच्या पुढे चालणाऱ्या दोन कारचालकांनी आपली गती अचानकपणे कमी केली. यावेळी बस भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सूटल्याने समोरील दोन्ही कारला बसने धडक दिली. हा अपघात रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई-केज रोडवरील पिसेगाव फाट्यावर घडला. यात तिन्ही वाहनांचे चालक जखमी झाले.

दि. ५ मार्च रोजी दुपारी १:४५ वाजण्याच्या सुमारास केज अंबाज ोगाई रोडवर असलेल्या पिसेगाव फाट्या जवळ असलेल्या पेट्रोल पंपा जवळ झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात अंबाजोगाई कडून येणारी एक कार ही उजव्या बाजूला वळत असल्याने त्याच रस्त्याने पाठी मागून केजकडे येणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट आणि मारुती सुझुकी रिट्झच्या चालकांनी त्यांचा वेग कमी करताच पाठी मागून येणाऱ्या भरधाव वेगातील अंबाजोगाई आगाराच्या अंबाजोगाई-संभाजीनगर एस टी बसने त्या दोन्ही कारला पाठीमागून जोराची धडक दिली.

यामध्ये चालक दत्ता लांडगे (रा. केज जि. बीड) यांना मुका मार लागून ते जखमी झाले आहेत. तर मारुती सुझुकी रिट्झ गाडीचा चालक विनोद जगताप (रा. कळंब जि. धाराशिव) आणि एसटी चालक मारुती फड (रा. पट्टीवडगाव ता. परळी) यांना मुका मार लागून जखमी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT