वडवणी : तालुक्यातील चिंचवण येथे घरगुती वादातून मुलाने स्वतःच्या ७० वर्षीय वडिलांचा विटेने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २७) सायंकाळी घडली. वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या वृद्ध वडिलांवरच मुलाने हल्ला केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी वडवणी पोलिसांनी आरोपी मुलाला काही तासांत ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शुभम फुलचंद कोठुळे (वय २०, रा. चिंचवण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे वडील फुलचंद श्रीकिसन कोठुळे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१), 100 0 CL () Crime Meth lab bus expensive ११५ (२) व ३५१ (२) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी घरगुती कारणावरून कुटुंबात वाद सुरू होता. त्यावेळी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य श्रीकीसन भागोजी कोठुळे (वय ७०) यांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने संतापाच्या भरात घरासमोरील अंगणातील विट उचलून वडिलांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार केल्याचा आरोप 1 आहे. गंभीर दुखापत झाल्याने श्रीकीसन कोठुळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नातू शुभम कोठुळे यांनी मंगळवारी वडवणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे करीत असून, घटनेमागील नेमके कारण आणि कौटुंबिक वादाचे स्वरूप याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे चिंचवण गावात शोककळा पसरली आहे. क्षणिक राग, कौटुंबिक तणाव आणि हिंसाचार यांचे परिणाम किती भीषण ठरू शकतात, याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे. पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.