Beed News : पुतण्याचा जीवन संपवण्याचा धक्का; चुलत्याचाही हृदयविकाराने मृत्यू file photo
बीड

Beed News : पुतण्याचा जीवन संपवण्याचा धक्का; चुलत्याचाही हृदयविकाराने मृत्यू

बीड शहरातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी रात्री 39 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन संपविल्याची जीवन घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

बीड, पुढारी वृत्तसेवाः बीड शहरातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी रात्री 39 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन संपविल्याची जीवन घटना घडली. ही दुःखद बातमी समजताच त्याच्या चुलत्याचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. अवघ्या एका तासाच्या अंतराने कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बीड शहरातील शिवाजीनगर येथे वास्तव्यास असलेले स्वप्नील ऊर्फ सोनू बुधवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, पुतण्याच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचे चुलते तथा बांधकाम व्यावसायिक अशोक चंद्रसेन कदम (५२, रा. अशोकनगर, बीड) हे घटनास्थळी पोहोचले. घरातील सदस्यांना धीर देत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

एका पाठोपाठ घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे बार्शी नाका व शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली आहे. स्वप्नील ऊर्फ सोनू कदम आणि अशोक कदम या दोघांवर गुरुवारी (दि. २५ जून) दुपारी भगवान बाबा प्रतिष्ठानजवळील स्मशानभूमीत वातावरणात करण्यात आले. शोकाकुल अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT