बीड पुढारी वृत्तसेवा : स्वर्गीय विनायक मेटे यांच्यापासून भाजपसोबत असलेली शिवसंग्राम संघटना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेतला.
शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये महाविकास आघाडी सोबत राहिल्या होत्या. त्यानंतर आता बीड विधानसभेसाठी देखील त्यांनी तयारी केलेली आहे. दोन दिवसापूर्वीच त्यांनी माझ्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचे म्हटले होते. यानंतर आज त्यांनी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक जागांच्या निकालावर परिणाम होऊ शकतो.