Sexual harassment of a student who did not pay school fees
बीड, पुढारी वृत्तसेवा : उमाकिरण शैक्षणिक संकुलातील प्रोफेशनल कोचिंग क्लासेसचा संचालक विजय पवार याच्यावर पोक्सोअंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. विजय पवारच्याच ज्ञानेश्वर पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा २०२३ मध्ये छळ करण्यात आला होता. तसेच जातीचा उल्लेख करत अपमानास्पद वागणूक दिली होती. या प्रकरणाची दखल घेत शिव-ाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड येथील ज्ञानेश्वर पब्लिक इंग्लिश स्कूल ही नावाजलेली शाळा म्हणून परिचित आहे. त्या ज्ञानमंदिरातच विजय पवार याने विद्यार्थिनीवरच हात टाकल्याने शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शहरातील एका पालकाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बार्शी रोडवरील ज्ञानेश्वर पब्लिक इंग्लिश स्कूल येथील शाळेत सन २०२२-२३ मध्ये एक मुलगी ८ वी आणि दुसरी मुलगी तिसरीच्या - वर्गात शिकत होती. सन २०२२ मध्ये शाळेच्या प्रिन्सीपल रश्मी अरोरा यांनी फीसमुळे ८ वीच्या वर्गातील मुलीचे हॉलतिकीट रोखले होते. त्यानंतर शाळेतसुध्दा बसू दिले जात नव्हते. त्यामुळे तिचे पालक शिक्षण विभागातील अधिकार्यांना घेऊन गेले व संचालक विजय पवार यांना बोलले, त्यावर त्यांनी मुलीला बसू देऊ, असे सांगितले होते.
मात्र त्यानंतरही तिला शाळेत बसू दिले जात नसल्याने फिर्यादीचे सासरे विजय पवार आणि अरोरा मॅडम यांना भेटण्यासाठी शाळेत गेले असता, तुझा जावई माझ्या शाळेविरुध्द तक्रारी करतो, मी त्याच्या मुलींना माझ्या शाळेत शिकू देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असे सांगितले होते. याप्रकरणी मी शिक्षण विभागात तक्रारसुध्दा केली होती. मात्र त्याची कोणीच दखल घेतली नाही.
यानंतर आता उमाकिरण शैक्षणिक संकुलातील लैगिंक शोषणाचा प्रकार समोर आला. ते पाहून ८ वीच्या वर्गात ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलमध्ये शिकलेल्या माझ्या मुलीने माझ्यासोबतही असाच प्रकार घडल्याचे सांगितले. दि.१३ फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रिन्सीपल अरोरा मॅडम यांनी माझ्या मुलीला केबिनमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर अरोरा मॅडम क्लास व्हिजिटला गेल्या. त्यावेळी विजय पवारने '
तुझे वडील शाळेची फीस भात नाहीत, त्यांना पदाचा जास्त गर्व आहे', आमच्या शाळेच्या विरोधात तक्रार करतोय, असे म्यागत तुमची आमच्या शाळेत शिकायची लायकी नाही, असे सांगून तिच्याशी अम्मलील कृत्य करत बैंड टच केल्याचा प्रकार पडला, अशी माहिती माझ्या मुलीने दिल्याचे पीड़ित विद्यार्थिनीच्या पालकांनी फिर्यादीत माठाते आहे.
बाप्रकरणी संचालक विजय पवारविरुध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
तीन दिवसांपूर्वीच पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी बीडमध्ये पत्रकार परिषद मेऊन आपल्या मुलीसोबतही असा प्रकार पडल्याचे सांगितले होते. त्यानंतर शनिवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या पीडित विद्यार्थिनीचा आणि तिच्या पालकांय स्वाध घेण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या होत्या, त्यावरून काही तासांतच विजय पवार विस्थ्द हा गुन्हा दाखल झाला आहे.
उमाकिरण शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात विजय पवार सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. यादरम्यानच त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणीत भर पडली असून, आता या प्रकरणातही शिवाजीनगर पोलिस त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी करू शकतात.