Beed Crime News : जेसीबीचा ब्रेकर चोरणारी सात जणांची टोळी जेरबंद file photo
बीड

Beed Crime News : जेसीबीचा ब्रेकर चोरणारी सात जणांची टोळी जेरबंद

वडवणी पोलिसांची परभणीत कारवाई; गेवराई-जिंतूर-बिडकीनमधील गुन्ह्यांचाही उलगडा होणार.

पुढारी वृत्तसेवा

Seven-member gang stealing JCB breakers nabbed

वडवणी, पुढारी वृत्तसेवा : लोनवळ शिवारात बळीराजा पांदण रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारा तब्बल तीन टन वजनाचा आणि चार लाख रुपये किमतीचा जेसीबीचा 'टू-टेन' हायड्रोलिक्स ब्रेकर चोरून नेणाऱ्या सात जणांच्या सराईत टोळीला वडवणी पोलिसांनी परभणी येथून अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेला ब्रेकर जप्त करण्यात आला असून, या टोळीने गेवराई, जिंतूर व बिडकीन परिसरातही अशाच प्रकारच्या चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

लोनवळ शिवारात नामदेव हरिभाऊ खाडे यांच्या 'मोहनी राज कन्स्ट्रक्शन' मार्फत बळीराजा पांदण रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी वापरण्यात येणारा माऊली कंपनीचा हायड्रोलिक्स ब्रेकर २६ ऑगस्ट रोजी ट्रकमध्ये ठेवण्यात आला होता. सुमारे तीन टन वजनाचा हा ब्रेकर चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाल्यानंतर वडवणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

या प्रकरणी पोलिसांनी जगन्नाथ किसन काळे (४७, रा. राजा पिंपरी, गेवराई), अमोल अंकुश पवार (२८, रा. संजय नगर, गेवराई), सोमेश्वर मनोहर शेंबडे (रा. माढा कॉलनी, गेवराई), दत्तात्रय नारायण जाधव (रा. सावता नगर, गेवराई), किशोर लहू खंडागळे (रा. कोल्हेर रोड, गेवराई), रामेश्वर दिलीप पांगरे (रा. कुंभेजवळा, गेवराई) आणि नामदेव भगवान जाधव (रा. राजा पिंपरी, गेवराई) यांन अटक केली.

पोलिसांच्या तपासात ही टोळी अवजा यंत्रसामग्री चोरी करण्यासाठी जेसीबी, डस्टर क आणि पिकअप वाहनांचा वापर करत असल्याचे सम आले. चोरीचे साहित्य घटनास्थळावरून का वेळातच हलवून नेण्यासाठी आरोपी नियोजनब पद्धतीने काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झान आहे. ही कारवाई सय्यद सिद्दिकी अमीर सय्यद यांन केली.

दरम्यान, आरोपींकडून चोरीस गेलेला तीन टन वजनाचा हायड्रोलिक्स ब्रेकर पोलिसांनी जप्त केला असून, सातही आरोपींना वडवणी न्यायालयासमोर पोलीस कोठडीसाठी हजर करण्यात आले. या टोळीचे आणखी साथीदार असून, त्यांच्या शोधासह गेवराई, जिंतूर व बिडकीन परिसरातील अन्य गुन्ह्यांचाही तपास सुरू आहे. त्यामुळे या कारवाईतून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT