अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात सोमवारी परळीत महामोर्चा काढण्यात आला. pudhari photo
बीड

Anandraj Ambedkar : '५९ जाती गुण्यागोविंदाने नांदताना सरकारने भांडणे लावू नयेत'

परळीत उपवर्गीकरणविरोधी महामोर्चा; आनंदराज आंबेडकरांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

परळी : अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात सोमवारी परळीत महामोर्चा काढण्यात आला. ५९ जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने करू नये, अन्यथा तीव्र विरोध होईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी दिला. चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप यांनीही उपवर्गीकरणास कडाडून विरोध दर्शवला.

अॅड. अमन आनंदराज आंबेडकर यांनी ५९ जातींची एकी कायम ठेवण्याचे आवाहन केले. कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास बनसोडे, लक्ष्मण शिंदे तसेच संदीप मस्के यांनीही समाज एकसंध असल्याची भूमिका मांडली. सभेचे प्रास्ताविक श्रद्धा सूर्यवंशी हिने केले; तर प्रतीक्षा अरुण उजगरे हिने भाषण केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. माधव रोडे यांनी केले. यावेळी भंते महाविरो, पांडुरंग साबणे, दीपक पिंपळे उपस्थित होते.

मुलींच्या हस्ते निवेदन

मोर्चाचे निवेदन विद्यार्थिनींच्या हस्ते तहसीलदारांना देण्यात आले. तसेच, आनंदराज आंबेडकर व बबनराव घोलप यांचा विद्यार्थिनींच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. कडक उन्हातही परळीत हजारो नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT