ॲड. उज्ज्वल निकम  Pudhari News Network
बीड

आरोपींच्या मनात काय चाललंय मी ओळखलंय, मात्र सर्वांसमोर...; ॲड. उज्ज्वल निकम

Santosh Deshmukh Murder Case | Ujjwal Nikam | कराडच्या वकिलांनी मागितलेली सर्व कागदपत्रे दिली

पुढारी वृत्तसेवा

बीड, पुढारी वृत्तसेवा : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आज (दि.१०) सुनावणी झाली. यावेळी वाल्मीक कराडच्या वकिलांनी मागितलेली सर्व कागदपत्रे देण्यात आली. तर फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेला तुमच्या वकिलांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पुढील सुनावणी दि. २४ एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांनी सांगितले. (Santosh Deshmukh Murder Case)

खंडणी आणि संतोष देशमुख हत्यामध्ये कुठलाही संबंध नसून या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात यावे, अशी मागणी वाल्मीक कराडने अर्जाद्वारे केली आहे. दरम्यान, दि. २४ एप्रिलरोजी कराडच्या अर्जावर पुढील सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात होणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आजच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. (Santosh Deshmukh Murder Case)

ते पुढे म्हणाले की, वाल्मीक कराडने संतोष देशमुख प्रकरणात मी निर्दोष आहे, असा केविलवाणा प्रयत्न अर्जामधून केला आहे. या अर्जाची सुनावणी होईल. त्यानंतर ड्राफ्ट चार्ज होईल, त्यानंतर युक्तिवाद होईल. त्यानंतर आरोप निश्चिती झाल्यानंतर पुढील न्यायालयीन कारवाई सुरू होईल. आरोपींच्या मनात काय चाललंय मी ओळखतो. मात्र, ते मी सर्वांसमोर सांगू शकत नाही. देशमुख कुटुंबीयांनी भेट घेतली. मात्र, अशा भेटीमधील गोष्टी बाहेर सांगता येत नाहीत.असेही ते म्हणाले.

आरोपींची चलअचल संपत्ती काय आहे. याचा सीआयडी तपास करीत आहे. वाल्मीक फरार असल्यावेळी संपत्ती जप्त करण्याचा निर्णय झाला होता. आता मोका संदर्भात संपत्ती जप्त करा. आरोपींच्या वकिलांनी मागितलेली कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. आरोपींनीच रेकॉर्ड केलेला संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायालयात सादर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बाहेर येऊ नये, अशी विनंती कोर्टाकडे केल्याचे निकम यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT