Santosh Deshmukh murder case pudhari photo
बीड

Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १ सप्टेंबरला

आरोपींच्या वकिलांची पेनड्राईव्हचा क्लोन कॉपीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १ सप्टेंबर रोजी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी यापूर्वी देण्यात आलेल्या पेनड्राइव्हच्या कॉपीमध्ये तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत त्याची क्लोन कॉपी देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यामुळे या मागणीवरही पुढील सुनावणीत सुनावणी होणार आहे.

दरम्यान, सरकारी पक्षाने खटला लवकरात लवकर सुरू करण्यासाठी न्यायालयात स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांना न्यायालयीन समन्स पाठवून त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात यावे, अशी ठोस मागणी सरकारी पक्षाने केली आहे. त्यामुळे साक्षीदारांच्या जबाब नोंदविण्याची प्रक्रिया लवकर सुरू होण्याची शक्यता असून, पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.

साक्षीदारांना समन्स पाठविण्याची मागणी

सरकारी पक्षाने केवळ खटला लवकर सुरू करण्याची मागणी न करता साक्षीदारांना न्यायालयीन समन्स बजावण्याचा स्वतंत्र मुद्दा न्यायालयासमोर मांडला आहे. यामुळे प्रकरणातील प्रत्यक्ष सुनावणीची प्रक्रिया पुढे नेण्याचा सरकारी पक्षाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धनंजय देशमुख म्हणाले, “या प्रकरणाची सुनावणी आता आणखी लांबू नये. आरोपीचे वकील जाणीवपूर्वक वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहेत. न्यायालयाने साक्षीदारांना समन्स पाठवून प्रत्यक्ष सुनावणीची प्रक्रिया लवकर सुरू करावी, अशी आमची मागणी आहे.

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी खटल्याची सुनावणी तातडीने होणे गरजेचे आहे.” आता १ सप्टेंबरच्या सुनावणीत पेनड्राइव्हच्या क्लोन कॉपीची मागणी, साक्षीदारांना समन्स बजावण्याचा सरकारी पक्षाचा अर्ज आणि प्रत्यक्ष खटला सुरू करण्याबाबत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘वेळकाढूपणा थांबवून सुनावणी लवकर घ्यावी’

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुनावणीनंतर माहिती देताना आरोपींच्या वकिलांकडून जाणीवपूर्वक वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप केला. तसेच न्यायालयाने प्रत्यक्ष सुनावणी लवकर सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT