Sant Gajanan Maharaj Palkhi sohala
संत गजानन महाराजांच्या पालखीचे परळी वैजनाथ येथे आगमन झाले  Pudhari News Network
बीड

संत गजानन महाराजांच्या पालखीचे वैद्यनाथनगरीत आगमन!

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : भाविकांचे श्रध्दास्थान असलेले संत श्रेष्ठ गजनान महाराज यांच्या पालखीचे रविवारी (दि.३०) प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत शक्तीकुंज वसाहत येथे आगमन झाले. श्रींच्या पालखीचे परळीच्या भाविकांनी उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले.

आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभु वैद्यनाथाच्या नगरीतून छोट्या-मोठ्या पालख्याचे आगमन परळी शहरात होत असते. रविवारी संत श्रेष्ठ गजनान महाराज यांच्या पालखीचे परळीच्या भाविकांनी दमदार स्वागत केले. भाविकांचे श्रध्दास्थान असलेले विदर्भातील श्रींची पालखी परळीत दाखल झाली असून श्रींची पालखी परळीनगरीत औ.वि.केंद्रात मुक्कामासाठी थांबली आहे. श्रींची पालखी उद्या सकाळी सातच्या सुमारास परळीच्या मुख्यरस्त्यावरून मार्गस्थ होईल. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा परळी वैजनाथ येथील संत जगमित्र मंदीरात उद्या मुक्कामी राहणार आहे.

SCROLL FOR NEXT