चोरट्यांनी भगवान भोसले यांच्या घरी अस्ताव्यस्त करून टाकलेले साहित्य  (Pudhari Photo)
बीड

Beed Theft | घरातील सर्व जण कीर्तनात दंग; मध्यरात्री दीड तोळ्यांच्या दागिन्यांसह २० हजारांची रोकड लांबवली

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटणमध्ये चोरीच्या घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Ashti gold ornaments stolen

आष्टी : तालुक्यातील सांगवी पाटण गावात भगवान देवराव भोसले यांच्या घरी रात्री गुरूवारी (दि.१३) अंदाजे ११ ते १२ च्या दरम्यान चोरीची घटना घडली. घरातील सर्व मंडळी भैरवनाथ जन्माष्टमीच्या कीर्तनासाठी बाहेर गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.

घटनेची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल सव्वाशे, सरपंच दत्तात्रय खोटे, उपसरपंच राहुल खिलारे, पांडुरंग भोसले, राजू भोसले, महेश भगत, समाजसेवक समीर शेख यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, विशेषतः संध्याकाळी व रात्री काळजी घेण्याचे सूचन ए.पी.आय नरवडे यांनी ग्रामस्थांना दिले आहे. घरांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT