Samruddhi Mahaparg Robbery pudhari
बीड

Samruddhi Mahamarg Robbery: समृद्धी महामार्गावरील दरोड्याच्या सूत्रधाराला बीड जिल्ह्यातून अटक; गाडीतील कॅमेऱ्यात चेहरा दिसला

Anirudha Sankpal

Samruddhi Mahamarg Robbery: मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला बीड जिल्ह्यातून अटक केली आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा गावाचा रहिवासी किरण अजिनाथ गायकवाड या सूत्रधाराला त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे.

२६ ऑगस्ट रोजी गाडीत गंभीर रूग्ण असतानाही दरोडेखोरांनी गाडीमधील लोकांना बेतम मारहाण करून लुटले होते. लुटणाऱ्या लोकांनी रस्त्यावर लोखंडी वस्तू फेकून गाडी निकामी केली होती. गाडीचा रेडिएटर फुटून ऑईल गळू लागले होते. त्यामुळं गाडी रस्त्यावर थांबवावी लागली होती.

विशेष म्हणजे लुटमार झालेल्या व्यक्तीच्या गाडीत डॅशकॅम होता. त्यामुळं दरोडेखर आरोपींचे चेहरे त्या डॅश कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यावरून तपासात मदत झाली होती.

या घटनेत एर्टिंगा गाडीला लक्ष्य करण्यात आलं होतं. या घटनेत गाडी चालक किरण खंदारे यांच्या खिशातील ७ हजार रूपये रोकड, डिगीतील ३४ हजार कोटी रूपये तसेच गळ्यातील २ तोळ्याची सोन्याची चेन आणि ५ ग्रॅम वजनाची अंगठी असा ऐवज लुटण्यात आला होता.

लुटीवेळी प्रवाशांनी विरोध केला असता दरोडेखोरांनी त्यांना मारहाण केली होती. विशेष म्हणजे, आमदार संतोष बांगर यांच्या पत्रावर एका गंभीर रूग्णाच्या उपचारासाठी हिंगोली जिल्ह्यातील लोहगाववरून ही गाडी मुंबईला चालली होती. यावेळी समृद्धी महामार्गवारील दुसंगवाडी शिवारात त्यांना लुटण्यात आले. चालक किरण खंदारे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT