सरपंच आरक्षण  (File Photo)
बीड

Parli Vaijnath Sarpanch Reservation| परळी वैजनाथ तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची आज तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

Gram Panchayat Reservation in Parli Vaijnath

परळी वैजनाथ : परळी तालुक्यातील सन 2025- 30 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची आज (दि.16) तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली. या सोडती मधून वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी सरपंच पदाच्या जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यामुळे तालुक्यातील कोणत्या गावच्या ग्रामपंचायतचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गाला आरक्षित झाले? याची निश्चिती करण्यात आली.

 कोणत्या गावचे आरक्षण कोणते? पहा यादी   

सर्वसाधारण प्रवर्ग : पोहनेर, कावळयाचीवाडी, बोधेगाव, वाका, परचुंडी, नागापुर, कन्हेरवाडी, ममदापुर, आचार्य टाकळी, रेवली, वानटाकळी, लोणारवाडी, इंदपवाडी डाबी, लोणी, वडगाव दा,खोडवा, सावरगाव, हाळंब, नागदरा, तपोवन, माळहिवरा, मांडेखेल, वाघबेट, जिरेवाडी, गुट्टेवाडी.

सर्वसाधारण प्रवर्ग (महिला): तेलसमुख, बोरखेड, हिवरा गो., सिरसाळा, गडदेवाडी, तडोळी, दौनापुर, मिरवट, चांदापुर, नंदागौळ, जळगव्हाण, भिलेगाव, वडखेल, आस्वलंबा, भोपला, मरळवाडी, हेळंब, दैठणा घाट पिंपळगाव गाढे, पांगरी नागपिंप्री, टोकवाडी, सारडगाव, मांडवा प.,मालेवाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग: कौडगाव हुडा कौडगाव साबळा, कौठळी, लिंबुटा, सेलु प., नंदनज, लेंडेवाडी, मैंदवाडी कासारवाडी प., वंजारवाडी, जयगाव, मलनाथपुर

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): पिंपरी बु.,औरंगपुर, कौडगाव घोडा, इंजेगाव, सोनहिवरा, तळेगाव प., बेलंबा, लाडझरी, धर्मापुरी, भोजनकवाडी, गोवर्धन हि.,संगम

अनुसुचित जाती प्रवर्ग: लमाणतांडा प., दौंडवाडी, टाकळी दे.,खामगाव, डिग्रस, सेलु स. , मोहा

अनुसुचित जाती प्रवर्ग (महिला): वानटाकळी तांडा,सरफराजपुर, पाडोळी,रामेवाडी का. ब्रम्हवाडी,नाथ्रा.वाघाळा प. करेवाडी,

अनुसूचित जमाती प्रवर्ग: दाऊतपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT