knife attack Pudhari
बीड

Beed Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याचा राग; रामपुरी चाकूने हल्ला

गेवराई पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत दोघांवर रामपुरी चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना 29 मे रोजी रात्री देवकी शिवारातील विठ्ठलनगर परिसरात असलेल्या हॉटेल डिसेंट समोर घडली. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश शिवाजी चोरमले (रा. बाग पिंपळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनंजय नारायण सरक (रा. बाग पिंपळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपीने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने संतापून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने रामपुरी चाकूने वार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT