बीड

Beed accident news | दुचाकी आणि कारचा भीषण अपघात; राजपिंपरी येथील एकजण ठार, एक गंभीर जखमी

गेवराई येथे कपडे खरेदी करून‌ राजपिंपरीकडे जात असताना हा अपघात झाला

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : राजपिंपरी येथील दोघेजण गेवराई येथे कपडे खरेदी करून गावाकडे जात असताना छोटा हत्ती ( रिक्षा ) ने कट मारल्याने दुचाकीवर मागे बसलेला एक जण खाली पडला. त्यावेळी समोरुन आलेल्या कारने त्याला चिरडल्याने यात तो ठार झाला, तर एकजण किरकोळ जखमी झाला. ही घटना शहराजवळील जमादारणीच्या फुलाजवळ रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.

भुषण भागवत पानखडे (वय : १५ वर्ष) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून, तो आत्ताच नववीची परीक्षा पास होऊन दहावीच्या वर्गात गेला होता. तर सोबत असलेला चुलत भाऊ गणेश विठ्ठल पानखडे असे जखमीचे नाव असून (दोघेही राहणार राजपिंपरी) ते दोघे रविवार रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गेवराई येथे कपडे खरेदी करून‌ राजपिंपरीकडे जात असताना हा अपघात झाला.

शहराजवळील जमादारणीच्या फुलाजवळ बाजूला असलेल्या छोटा हत्तीने (रिक्षा ) दुचाकीला कट मारल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेला भूषण वानखडे खाली पडला. त्यावेळी समोरुन येणारी कार त्यांच्या अंगावरून गेल्याने यात याचा जागीच मृत्यू झाला तर गणेश विठ्ठल पानखडे हा किरकोळ जखमी झाला. घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद चालु होती. भूषण पानखडेच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT