Raids on three gambling dens; Twenty-three gamblers arrested
बीड, पुढारी वृत्तसेवा स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी नांदुरघाट, तेलगाव व बीड शहरातील नागोवा गल्लीत जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या तीन कारवायांमध्ये तेवीस जुगाऱ्यांना अटक करण्यात आली तर तब्बल अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नवनित कावत यांनी बीड जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध धंदयाची माहीती काढुन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका दिवसात तीन जुगार अड्डावर छापा टाकला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने याचे पथकाने पोलीस ठाणे केज हद्दीत नांदुरघाट येथे दिक्षा किराणा च्या मागे चालणाऱ्या तिरट नावाचा जुगारावर छापा मारुन आरोपी बबलु सत्तार शेख, अविनाश तुकाराम लोंढे, नवनाथ निवृत्ती मगरे, बबन एकनाथ गायकवाड, आकाश बापु शिंदे, सुशिल शिवाजी त्रिमुखे, प्रकाश गेणवा जाधव, चंदु दशरथ जाधव, ऋषिकेश भिमा गायकवाड, व विनोद देविदास हांगे यांना पकडुन त्याचे ताब्यातुन तिरट जुगाराचे साहीत्य, नगदी, मोबाईल, मोटार सायकल असा एकुण २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याच पथकाने पोलीस ठाणे दिंद्रुड हद्दीत तेलगांव ते परळी रोडलगत एसार पेट्रोलपंपाचे मागे तिरट जुगार खेळणाऱ्या आरोपी दत्ता मधुकर लगड, अक्षय सुरेश लगड, सचिन नारायण कटारे, पोपट प्रकाश सोनवणे, बळीराम नामदेव तिडके, अंकुश लक्ष्मण लगड यांना पकडुन त्याचे ताब्यातुन नगदी, जुगाराचे साहीत्य, मोटार सायकल मोबाईल् असा एकुण २लाख १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर याचे पथकाने पोलीस ठाणे पेठ बीड येथील नागोबा गल्ली येथे तिरट नावाचा जुगार चालणाऱ्या अड्ड्यावर छापा मारुन आरोपी अब्दुल फईल जलीम मोमीन कृष्णा अशोक परळकर, वैभव पांडुरंग तांगडे, अमित शरद जोगदंड, अकबर मुसा खान, राजु रवी क्षीरसागर, संकेत चंद्रकांत तांगडे, शेख अमेर शेख अन्सार, यांना पकडुन त्याचे ताब्यातुन दुचाकी, मोबाईल, नगदी असा एकुण ६ लाख ३५ हजार ५७० रू मुद्देमाल हस्तगत करुन त्यांच्या विरोधात पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील कामगिरी नवनित काँवत, सचिन पांडकर, शिवाजी बंटेवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार महेश जोगदंड, आनंद म्हस्के, विकास राठोड, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, बप्पासाहेब घोडके, अर्जुन यादव, आशपाक सय्य्द, मनोज परजणे, चालक नितीन वडमारे, सुनिल राठोड, गणेश मराडे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे.