

केज : दोन पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना (दि.१३) सायंकाळी ६:३० च्या केज-अंबाजोगाई महामार्गावर घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी, केज-अंबाजोगाई महामार्गावर डिघोळअंबा ते लोखंडी सावरगाव येथे सायंकाळी दोन भरधाव पिकअपची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांतील दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अमजद सय्यद आणि गित्ते हे अपघातस्थळी हजर झाले. त्यांनी जखमींना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातातील जखमींची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.